HW Marathi
राजकारण

संभाजी भिंडेंच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीला सैनिकाने केला सॅल्यूट

सांगली | कोल्हापूर आणि सांगलीतील पूर परिस्थितीमुळे या दोन्ही जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यापूरग्रस्तांना मदत करण्यासाठी कोल्हापूर आणि सांगलीतील नेते मंडळी समाजाजिक संघटना आणि समाजसेवक स्वत: ला झोकून देऊ दिले आहे. मात्र, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संघटनेचे संघटनेचे संभाजी भिडे कुठे आहेत ?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विचारला होता. या नेत्यांना सैन्यातील जवानांनी संभाजी भिडे यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे जेवढे कार्यकर्ते आहेत, त्यांना माझा सॅल्यूट आहे. आमच्या खायचे, राहायचे, नाश्त्याचे सर्वकाही बघत होता. आमचे काम तर त्यानी पाहिलंच, पण आम्हाला शेवटी जाण्यासाठीही त्याने मदत केली. संघटनेच्या अनेक मित्रांनी या कामी आम्हाला मदत केली, सर्वांची नाव मला माहिती नाहीत. त्यामुळे, मी सर्वांचे आभार मानतो, अशा शब्दात सैन्य दलाच्या एका तुकडीने संभाजी भिंडेंच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या कार्याचे कौतुक केले आहे. ‘संघटनेचे सर्वच कार्यकर्ते आमच्यासोबत होते. जेवढ आम्ही काम केले, त्याच्या दुपटीने तुमच्या कार्यकर्त्यांनी काम केले. तुमची आणि आमची अशीच एकता राहिली, तर आम्ही कुठेही फत्ते करू शकतो, असे म्हणत सैन्यातील या जवानाने हिंदुस्थान प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना सॅल्यूट’ केला आहे.

 

 

Related posts

मि जातीपातीसाठी नाही, तर महाराष्ट्राच्या मातीसाठी लढतोय | राज ठाकरे

News Desk

#LokSabhaElections2019 : पंतप्रधान मोदींनी ट्विट केला निवडणूक प्रचाराचा पहिला व्हिडीओ

News Desk

जाहीरनाम्यात राम मंदिराच्या मुद्द्याचा समावेश केलात तर तुम्हाला पाठिंबा देऊ !

News Desk