HW Marathi
राजकारण

चोर आमच्या घरातच आहेत, आधी त्यांचा बंदोबस्त करा !

मुंबई | “चोर आमच्या घरातच आहेत. या चोरांचा आधी बंदोबस्त करा. एअर स्ट्राईक होतच राहतील”, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला घरचा आहेर दिला आहे. शिवसेना-भाजपची युती होण्यापूर्वी शिवसेनेकडून ‘सामना’मधून भाजपवर सतत प्रचंड टीका आणि आरोप होत होते. मात्र, युती झाल्यानंतर कटाक्षाने भाजपविरोधी थेट टीका करणे शिवसेनेने टाळले होते. दरम्यान, आता संजय राऊत यांनी पुन्हा राफेल मुद्द्यावरून नाव न घेता भाजपवर निशाणा साधला आहे.

“एअर स्ट्राईक होतच राहतील. राफेल प्रकरणातली महत्वाची कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेली हे आम्ही किंवा विरोधी पक्ष म्हणत नाहीत, तर स्वतः सरकार सांगत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. एकीकडे आमचे जवान सीमेवर लढत आहेत, एअर स्ट्राईक करीत आहेत. दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करीत आहेत. परंतु, दुसरीकडे जर आमच्या संरक्षण खात्याला वाळवी लागली असेल तर मग चोर आमच्या घरातच आहे. या चोरांचा आधी बंदोबस्त करा. एअर स्ट्राईक होतच राहतील”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Related posts

प्रवीण गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

संपूर्ण देशाला माहिती आहे कि देशाचा चौकीदार चोर आहे !

News Desk

पुन्हा एकदा शेतकऱ्यांना लेखी आश्वसनाचे गाजर ?

News Desk