HW News Marathi
राजकारण

संजय शिंदे यांचा लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश, माढ्यातून उमेदवारी देखील मिळणार ?

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुका आता काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत आणि पक्षांतराचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा माढ्याचा तिढा आता जवळपास सुटल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर आता आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांना माढ्यातून उमेदवारी दिली जाईल, अशी जोरदार चर्चा सुरु आहे. संजय शिंदे हे भाजपच्या मदतीने सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष झाले होते.

संजय शिंदे आता आपल्या पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार हे माढ्यातील पदाधिकाऱ्यांची आज (२२ मार्च) दुपारी ४ वाजता बैठक घेतील. या बैठकीनंतर राष्ट्रवादीकडून माढ्यासह इतर मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील अशी माहिती मिळत आहे. खरंतर, शरद पवार हेच माढा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. मात्र, एकाच कुटुंबातील इतके जण नको, असे म्हणत शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटक निवडणुकीबाबत अजित पवारांचा गौप्यस्फोट

News Desk

“पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाले, तर…,” संजय राऊतांचे संकेत

Aprna

गरीबांना अजून गरीब आणि श्रीमंतांना श्रीमंत करणे ही भाजपची नीती | अजित पवार

News Desk