HW News Marathi
राजकारण

“आगे आगे देखो होता है क्या” मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान, दिग्गज नेत्यांचा भाजप प्रवेश

मुंबई | आमच्या पक्षातील उमेदवारांमध्ये फारसे वाद नाहीत. त्यामुळे आज किंवा उद्यापर्यंत भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात येणार असलयाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी आज (१९ मार्च) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री पुढे असे देखील म्हणाले की, “विरोधीपक्ष नेत्यांचा युतीकडे ओढा असल्याचे सांगत, “आगे आगे देखो होता है क्या”, असे सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्याचे वक्तव्य महत्वाचे मानले जाते. त्यामुळे मुलगा सुजय पाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपमध्ये सामील होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. फडणवीस म्हणाले की, “२०१४ साली लोकसभा निवडणुकांवेळी भाजपची देशात मोठी लाट होती. यावेळी त्याहून मोठी लाट आहे. अनेक पक्षांचे मोठे नेते भाजपत प्रवेश करत आहेत. तर अनेक पक्षांचे प्रमुख नेते भाजपत येण्यास उस्तुक आहेत. सध्या महायुतीसाठी अनुकूल वातावरण आहे.” तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्यातील खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे उद्या (१९ मार्च) दुपारी १२.३० वाजात भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

एअरस्ट्राईक बद्दल शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, “पवार साहेब मॅच्युअर आहेत, ते योग्य वक्तव्य करतील, मात्र त्यांच्या पक्षामध्ये अनेक इंमॅच्युअर लोके आहेत ते काहीतरी बोलतात, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही” असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. भाजपच्या मीडिया सेलच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पद्मश्री आचरेकरांना शासकीय इतमामात निरोप न दिल्याने सरकारचा कोतेपणा उघड !

News Desk

भैय्यू महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्याच विश्वासू सेवकाला अटक

News Desk

मंत्रीस्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना नाहीत केवळ अर्धन्यायीक प्रकरणांसाठी आदेश

Aprna