HW News Marathi
राजकारण

शरद पवार योग्य बोलतात, त्यांचे घर पैशाने भरलेले !

मुंबई | “शरद पवार म्हणतात कि, माझे घर भरलेले आणि मोदींचे घर रिकामी आहे. शरद पवार खरं बोलतात. शरद पवार यांचे घर पैशाने भरलेले आहे. तर पंतप्रधान मोदींवर कधीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत”, असा टोला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी लगावला आहे. “फेकू म्हटले की गूगलवर मोदी आणि पप्पू म्हंटल की राहुल दिसतात. ते एका कॅम्पेमनिंगमुळे झाले आहे. मनसेच्या आयटी टीमला हे कदाचित माहित नसावं”, असा टोलाही विनोद तावडे यांनी मनसेला लगावला आहे. ते आज (८ मार्च) मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

विनोद तावडे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

  • ‘शरद पवार म्हणतात कि, माझे घर भरले आणि मोदींचे घर रिकामे आहे’ शरद पवार खरे बोलतात. शरद पवार यांचे घर पैशाने भरलेले आहे. पंतप्रधान मोदींवर कधीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत.
  • गेल्या ५ वर्षात अशी कोणती घटना घडली की अभिव्यक्ती स्वतंत्र दाबले गेले ? काँग्रेसच्या काळात अनेक कलाकारांवर गळचेपी झाली.
  • काँग्रेसची तत्व आम्हाला पटतात असे ज्या कलाकारांना वाटत यात काही गैर नाही. पण कोणाचेही व्यक्ती स्वतंत्र हिरावले गेलेले नाही. त्या ६०० कलाकारांना असे का वाटते हा प्रश्न आहे.
  • F16 विमानाच्या बाबतीत राज ठाकरे यांनी जे वक्तव्य केले त्यात अमेरिकेने कोणताही गैरप्रकार न झाल्याचा खुलासा केला आहे.
  • फेकू म्हटले की गूगलवर मोदी आणि पप्पू म्हंटल की राहुल दिसतात. ते एका कॅम्पेमनिंगमुळे झाले आहे. मनसेच्या आयटी टीमला हे कदाचित माहित नसावं.
  • नंदन निलेकणी हे आधार कार्डसंदर्भात मोदी यांना भेटले. त्यानंतर त्यात बदल करून आधार कार्ड योजना आणली गेली.
  • विवी पॅटमुळे मतदान करायला वेळ लागणार आहे. त्यामुळे मतदानाचा वेळ वाढवून द्यावा”, अशी मागणी आम्ही करत आहोत. कारण, आता एका मतदानाला ७ सेकंद एवढा वेळ लागणार आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता अंमलबजावणी करा !

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदीचे कार्यकर्त्यांना आवाहन- समाजात फुट पडू देऊ नका

News Desk

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंशी झालेल्या चर्चेनंतर आमदार कैलास पाटलांचे उपोषण मागे

Aprna