नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शंकराच्या पिंडीवर बसलेल्या विंचवासारखे असल्याचे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते शशी थरुर यांनी केले आहे. यानंतर सर्व स्तरातून थरुरवर टीकास्त्र होऊ लागली. या प्रकरणी थरुर यांना स्थानिक न्यायालयाने २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. भाजप नेते राजीव बब्बर यांनी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. थरूर यांच्या विधानांमुळे बब्बर यांनी आपल्या भावना दुखावल्याचे तक्रारीत म्हटले होते.
Delhi: Shashi Tharoor appeared before Rouse avenue court in "scorpion sitting on a shivling" remark case. Court grants bail to Tharoor on personal bond of Rs 20,000. Matter will now be heard on July 25 for recording of statement of complainant&BJP leader Rajeev Babbar (file pic) pic.twitter.com/byHZvZU5tO
— ANI (@ANI) June 7, 2019
थरुर यांनी गेल्यावर्षी बंगळुरू लिट फेस्टमध्ये शशी थरूर सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना पुस्तकातील काही पाने उपस्थितांना वाचून दाखवली होती. त्यामध्ये थरून यांनी पिंडीवरचा विंचू असे वादग्रस्त विधान केले होते. या वादग्रस्त विधानानंतर वाद निर्माण झाला होता. दिल्लीमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर शुक्रवारी सुनावणी झाली. त्याचवेळी न्यायालयाने शशी थरूर यांना जामीन मंजूर केला. याप्रकरणी आतापुढील सुनावणी २५ जुलै रोजी होणार आहे.
थरुर नेमके काय म्हणाले
बंगळुरू लिट फेस्टमध्ये शशी थरूर सहभागी झाले होते “निनावी आरएसएसच्या एका सुत्रांनी पत्रकाराला सांगितले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे शिवलिंगावर बसलेला विंचवासारखा आहे. आपण त्याला आपल्या हाताने काढून टाकू शकत नाही आणि चप्पलेने देखील मारू शकत नाही. “
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.