HW News Marathi
राजकारण

कसा झाला विनायक मेटेंच्या कारचा अपघात ?

मुंबई। शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे अपघाती मृत्यू झाला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.  विनायक मेटे यांच्या गाडीला आज (14 ऑगस्ट) सकाळी ५ वाजता अपघात झाला. या अपघातात विनायक मेटे गंभीर जखमी झाले होते. विनायक मेटेंना जखमी अवस्थेत कामोठेतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आल होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी विनायक मेटेंना मृत घोषित केले.
या अपघातात विनाटक मेटे आणि यांचा बॉडीगार्ड यांचा मृत्यू झाला असून गाडीचा चालक एकनाथ कमद बचावला आहे. तसेच हा अपघात नेमका कसा झाला याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या अपघातात विनाटक मेटेंचा चालक बचावला असून त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे. या अपघातदरम्यान विनायक मेटे हे गाडीच्या दुसऱ्या रांगेतील सीटवर बसले होते. तर त्यांचा बॉडीगार्ड हा पुढे बसला होता. त्यावेळी विनायक मेटेंच्या चालकाने लेन बदलत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यामुळे विनायक मेटेंच्या गाडीवरील डाव्याबाजुने ट्रकवर धडकील. यावेळी कारमधील एअरबॅग उघडली. त्यामुळे विनायक मेटेंची झोपले असून अचानक पुढे गाडीवर धडकल्याने विनायक मेटे यांच्या डोक्याला मार लागला.
विनायक मेटेंच्या अपघाताचे आठ पथक करणार तपास
विनायक मेटे यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना विनायक मेटेंनी अखेरचा श्वास घेतला. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय मोहिते, श्वान पथक अपघात स्थळी दाखल झाली असून आरटीओ आणि एसपीजी यांची आठ पथके तपास करणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील सीसीटीव्हींची फुटेज तपासणार आहेत.
गाडीला असा झाला अपघात
विनायक मेटे हे  फोर्ड Endeavour MH 01 DP 6364 या गाडीने मुंबईकडे निघाले होते. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या दुसऱ्या लेनने जाणाऱ्या कार चालकाचा त्यांच्या कारवरची ताबा सुटून पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला ठोकर मारून अपघात झाला आहे. सदर अपघातात आमदार विनायक मेटे हे अत्यंत गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ आयआरबी ॲम्बुलन्स एमजीएम रुग्णालयात कामोठे येथे उपचारा कामी दाखल केले असता डॉ.धर्मांग यांनी तपासून मयत घोषित केले आहे. व बाॅडीगार्ड पोलिस हवालदार राम ढोबळे हे कारमध्ये अडकल्याने कारमधून बाहेर काढून आय आर बी रुग्णवाहिकेने तात्काळ एमजीएम रुग्णालय,कामोठे येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. कार आयआरबी क्रेनच्या साह्याने रस्त्याचे बाजूला घेतली आहे. सदर वेळी आम्ही व PSI चव्हाण साहेब तसेच रसायनी पोलीस स्टेशन सहायक पोलीस निरक्षक बालवडकर व स्टाफ तसेच भारतीय राखीव दलाचे नवनाथ गोळे आणि स्टाफ हजर होते. या अपघातानंतर ट्रक चालक हा फरार झाला असून पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.
संबंधित बातम्या

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंदिर परिसरात प्लॅस्टिक आढळल्यास गुन्हा दाखल करणार !

News Desk

काँग्रेसने आपल्या देशाला गेली ५० वर्षे एप्रिल फूल बनवले !

News Desk

भाजपविरोधात रिपब्लिकन फ्रंटची स्थापना

Gauri Tilekar