HW News Marathi
राजकारण

वीर सावरकर पुन्हा दुर्दैवी ठरले ही वेदना आहेच!

मुंबई | भूपेन हजारिका आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून ‘भारतरत्न’ देण्यात आले आहे. तर नानाजी देशमुख हे सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कडवट स्वयंसेवक होते. सध्या सरकार ज्या विचारांचे आहे, त्या विचारांना ज्यांनी बळकटी दिली अशा धुरिणांचा ‘सन्मान’ करणे गैर नाही. वीर सावरकर ज्या काळकोठडीत काळ्या पाण्याच्या दोन जन्मठेपा भोगीत होते त्या कोठडीत काही काळ डोळे मिटून बसले व चिंतन केले. ते चिंतन अंदमानच्या सागरात वाहून गेले. सर्व ‘पद्म’, ‘रत्न’ पुरस्कारांचे अभिनंदन, पण वीर सावरकर पुन्हा दुर्दैवी ठरले ही वेदना आहेच!, मोदी सरकारने ‘भारतरत्न’ दिलेल्या व्यक्तींवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले असून वीर सावरकर यांना भारतरत्न न देणे ही दुर्दैवी आहे अशा शब्दात, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून टीका केली आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

वीर सावरकरांची काँगेस राजवटीत उपेक्षा आणि अपमान झाला, पण मोदी सरकारने त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी काय केले? विरोधी पक्षात असताना भाजपचे लोक वीर सावरकरांच्या भारतरत्नासाठी आग्रही होते, पण मोदी सरकारच्या काळात अयोध्येत राममंदिर झाले नाही आणि वीर सावरकरांना ‘भारतरत्न’देखील मिळाले नाही हे दुर्दैव आहे! डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधान मोदी अंदमानला गेले. वीर सावरकर ज्या काळकोठडीत काळ्या पाण्याच्या दोन जन्मठेपा भोगीत होते त्या कोठडीत काही काळ डोळे मिटून बसले व चिंतन केले. ते चिंतन अंदमानच्या सागरात वाहून गेले. सर्व ‘पद्म’, ‘रत्न’ पुरस्कारांचे अभिनंदन, पण वीर सावरकर पुन्हा दुर्दैवी ठरले ही वेदना आहेच!

प्रजासत्ताक दिनाचा आणखी एक सोहळा पार पडला आहे. राजपथावर नेहमीप्रमाणे शक्तिप्रदर्शन करून जगाचे डोळे दिपवले गेले. दरवर्षीच हे होत असते तसे ते यावेळीही घडले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी संदेश दिला, पण राजपथावरील शक्तिप्रदर्शन, राष्ट्रपतींचा संदेश यांची चर्चा न होता सरकारतर्फे ‘भारतरत्न’ किंवा ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा झाली त्यावरच चर्चा सुरू आहे. ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. तो यावेळी काँगेस ‘मुशी’त तयार झालेले ज्येष्ठ नेते व माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना देण्यात आला. त्याचवेळी नानाजी देशमुख, संगीत क्षेत्रातील ‘असामी’ भूपेन हजारिका यांनाही ‘भारतरत्न’ने सन्मानित केले. यापैकी नानाजी देशमुख हे सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कडवट स्वयंसेवक होते. सध्या सरकार ज्या विचारांचे आहे, त्या विचारांना ज्यांनी बळकटी दिली अशा धुरिणांचा ‘सन्मान’ करणे गैर नाही. भूपेन हजारिकांचेही योगदान संगीतात आहे, पण ते ‘भारतरत्न’च्या तोलाचे आहे काय? अशी टीका सुरू आहे. आसामातील लोकसभा निवडणुकांवर ‘डोळा’ ठेवून हजारिकांना मरणोत्तर वापरले असेल तर ते योग्य नाही. प्रणव मुखर्जी यांच्याविषयी अलीकडे भाजपास

प्रेमाचे भरते

आले आहे. प्रणव मुखर्जी हे ‘भारतरत्न’ होते तर मग श्री. मोदी किंवा भाजपने त्यांना राष्ट्रपतीपदाची दुसरी संधी का दिली नाही? मोदी म्हणतात, प्रणवबाबू हे राजकारण, प्रशासन वगैरेतील मार्गदर्शक, भीष्मपितामह आहेत व राष्ट्रपतीपदाच्या काळात त्यांनी आपल्याला सांभाळून घेतले. मग इतक्या महान व्यक्तिमत्त्वास मोदी सरकारने पुन्हा संधी दिली असती तर ही निवडणूक बिनविरोधच झाली असती. प्रणव मुखर्जी हे प्रथम राष्ट्रपतीपदासाठी उभे राहिले तेव्हा त्यांना भाजपने ‘काँग्रेसवाले’ म्हणून विरोध केला व त्यांच्या विरोधात उमेदवार उतरवला. प्रणव मुखर्जी यांच्या ज्या योग्यतेचे गुणगान आता मोदी सरकार करीत आहे, त्याच योग्यतेचे भान ठेवून शिवसेनेने प्रणव मुखर्जी यांना त्यावेळी पाठिंबा दिला होता व भाजपने त्याबद्दल आमच्या विरोधात काहूर माजवले होते. हे झाले पहिल्या वेळी. दुसऱ्या वेळी त्याच महान योग्यतेच्या जागेवर रामनाथ कोविंद यांची नेमणूक झाली तेव्हा झिडकारलेले प्रणव मुखर्जी आज मोदी राज्यात ‘भारतरत्न’ ठरले याचा आम्हाला आनंद आहे. म्हणजे राष्ट्रपतीपदासाठी मुखर्जी यांना शिवसेनेने दिलेला पाठिंबा योग्यच होता व त्यावर भाजपने आता शिक्कामोर्तब केले. ज्यांना ‘पद्म’ आणि ‘रत्न’ पुरस्कार दिले ते

आपापल्या स्थानावर योग्य

आहेतच, पण सातत्याने मागणी होऊन आणि लोकभावना तीव्र असतानाही स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’चा बहुमान का मिळू शकला नाही? वीर सावरकरांत असे काय कमी पडले की, मोदींचे सरकारही त्यांचा हा सन्मान करू शकले नाही. हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडणाऱ्या व स्वातंत्र्ययुद्धात महान त्याग करणाऱ्या वीर सावरकरांची काँगेस राजवटीत उपेक्षा केली गेली आणि अपमान झाला, पण मोदी सरकारने त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी काय केले? विरोधी पक्षात असताना भाजपचे लोक वीर सावरकरांच्या ‘भारतरत्न’साठी आग्रही होते, पण मोदी सरकारच्या काळात अयोध्येत राममंदिरही झाले नाही आणि वीर सावरकरांना ‘भारतरत्न’देखील मिळाले नाही हे दुर्दैव आहे! डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधान मोदी अंदमानला गेले. वीर सावरकर ज्या काळकोठडीत काळ्या पाण्याच्या दोन जन्मठेपा भोगीत होते त्या कोठडीत काही काळ डोळे मिटून बसले व चिंतन केले. ते चिंतन अंदमानच्या सागरात वाहून गेले. सर्व ‘पद्म’, ‘रत्न’ पुरस्कारांचे अभिनंदन, पण वीर सावरकर पुन्हा दुर्दैवी ठरले ही वेदना आहेच!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सवर्ण आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत मांडणार

News Desk

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

News Desk

महाराष्ट्राची ‘हिंदी’पणाकडे वाटचाल, मनसेकडून राज्य सरकारचा निषेध

News Desk