HW News Marathi
राजकारण

वीर जवानांना श्रद्धांजली वाहणे व मानवंदना देणे हा आता एक ‘राष्ट्रीय’ कार्यक्रम !

मुंबई | कश्मीरचा प्रश्न सुटला नाही असे जम्मू-श्रीनगरच्या भाषणात सांगण्यात आले, पण काल मेजर शशीधरन यांच्या बलिदानानंतर पुन्हा कश्मीरातील रक्तपाताचा प्रश्न उभा राहिला. श्री. मोदी यांनी रामलीलावरील भाषणात सांगितले की, ‘‘काँग्रेसने मला छळले!’’ स्वतःचे दुखणे बाजूला ठेवून देशाचे दुखणे दूर करतो तो राज्यकर्ता. पाकिस्तान छळत आहे व त्या छळात आमच्या जवानांचे बलिदान होत आहे ते आधी बघा. ‘‘चौकीदार एकालाही सोडणार नाही!’’ असेही पंतप्रधान म्हणतात. बरोबर आहे, एकालाही सोडू नका. त्याआधी पाकिस्तानला सोडू नका. आमचे तरुण लष्करी जवान जम्मू-कश्मीरमध्ये रोज मरत आहेत. या जवानांची छाती किती इंचांची ते माहीत नाही, पण ते कोणतेही रडगाणे न गाता लढत आहेत. काँग्रेसचे राज्य असतानाही लढत होते व आता मोदींचे राज्य आले तरीही त्यांची लढाई व हौतात्म्य संपलेले नाही. वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात ज्यांना अभिमान आणि गर्व वाटतो त्या राज्यकर्त्यांनी शहीद मेजर शशीधरन नायर यांच्या घरी जाऊन त्यांची माता, पत्नी व बहिणीचा आक्रोश समजून घेतला पाहिजे. रडगाणे व आक्रोश यातला फरक जेव्हा कळेल तो सुदिन. मेजर शशीधरन माफ करा, जवानांचे बलिदान तसे व्यर्थच जात आहे. वीर जवानांनो, माफ करा!, वीर जवानांना श्रद्धांजली वाहणे व मानवंदना देणे हा आता एक ‘राष्ट्रीय’ कार्यक्रम झाला आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समानच्या संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका केली आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

आमचे तरुण लष्करी जवान जम्मू-कश्मीरमध्ये रोज मरत आहेत. या जवानांची छाती किती इंचांची ते माहीत नाही, पण ते कोणतेही रडगाणे न गाता लढत आहेत. काँग्रेसचे राज्य असतानाही लढत होते व आता मोदींचे राज्य आले तरीही त्यांची लढाई व हौतात्म्य संपलेले नाही. चौकीदाराने याची दखल घेतली पाहिजे. राज्यकर्त्यांनी शहीद मेजर शशीधरन नायर यांच्या घरी जाऊन त्यांची माता, पत्नी व बहिणीचा आक्रोश समजून घेतला पाहिजे. रडगाणे व आक्रोश यातला फरक जेव्हा कळेल तो सुदिन. मेजर शशीधरन माफ करा, जवानांचे बलिदान तसे व्यर्थच जात आहे.

जम्मू-कश्मीरात हिंदुस्थानी जवानांचे बलिदान सुरूच आहे. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये शुक्रवारी दहशतवाद्यांनी दोन भयंकर स्फोट घडवले. त्यात मेजर शशीधरन नायर यांनी हौतात्म्य पत्करले आहे. याच हल्ल्यात आणखी एका जवानास वीरगती प्राप्त झाली. मेजर नायर हे मूळचे केरळचे असले तरी ते पक्के पुणेकर व फर्ग्युसन कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंब पुण्यातच आहे. त्यामुळे पुण्यातच त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मेजरसाहेबांना अंतिम निरोप देण्यासाठी मोठी गर्दी होती. त्यांनी मेजरसाहेबांच्या नावाने ‘अमर रहे’च्या घोषणा दिल्या. ‘पाकिस्तान मुर्दाबाद, भारतमाता की जय’च्या घोषणा दिल्या. ‘वंदे मातरम्’चाही गजर झाला. मेजरसाहेबांचा देह मातीत विलीन झाला. ही जगरहाटी अशीच वर्षानुवर्षे सुरू आहे. जम्मू-कश्मीरमध्ये आपण आजपर्यंत देशाचे अनेक तरुण सुपुत्र गमावले व गमवत आहोत. त्यानंतर शोक व्यक्त करणे, अश्रू ढाळणे व बदला घेण्याच्या पोकळ वल्गना करणे यापेक्षा अनेक वर्षांत काय घडले? गेल्या एक-दीड वर्षांत सुरक्षा दलांनी जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम चालवली आहे. शनिवारी मध्यरात्रीही जम्मू-कश्मीरच्या कुलगाम भागात सुरक्षा दलांनी ‘वॉण्टेड’ दहशतवादी झीनत उल इस्लाम याचा त्याच्या एका साथीदारासह खात्मा केला. मात्र त्यामुळे ना दहशतवादी कारवाया थांबल्या आहेत ना आमच्या जवानांचे शहीद होणे. शुक्रवारी

पाकिस्तानच्या सैन्याने

सुंदरबनी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचा भंग करून बेछूट गोळीबार केला. याचदरम्यान रूपमती आणि पुखराणी या दोन ठिकाणी स्फोट झाले. दोन्ही स्फोट पाकड्या दहशतवाद्यांनी घडवले. हिंदुस्थानी लष्कराने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. मात्र त्यात अवघ्या 33 वर्षांचे मेजर शशीधरन व आणखी एका जवानाला देशासाठी प्राणत्याग करावा लागला. मेजर शशीधरन व त्यांचे वीर साथी सीमेवर पाकड्यांशी लढत होते तेव्हा आमचे राज्यकर्ते म्हणवून घेणारे काय करीत होते? रामलीला मैदानावर सुरू असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान मोदींसह बरेच मंत्री-मुख्यमंत्री हजर होते व 2019 साली पुन्हा मजबूत सरकार आणण्याचे भाषण ठोकीत होते. याचा अर्थ काय घ्यायचा? 2014 साली संपूर्ण बहुमताचे सरकार मोदींनी स्थापन केले ते मजबूत नव्हते काय? ते ‘पोकळ’ होते काय? असे साडेचार वर्षांनंतर सांगणे हा मतदारांनी दिलेल्या बहुमताचा अपमान आहे. 2014 मध्ये तुम्हाला जनतेने पूर्ण बहुमताचे सरकार दिले, मात्र याच चार वर्षांच्या काळात कश्मीर खोऱ्यातील स्थिती जास्त चिघळली व रक्ताचे पाट वाहिले. त्यात आमच्या जवानांचे रक्त आणि बलिदान सगळ्यात जास्त होते. राममंदिर, भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी हटवणे वगैरे प्रचाराचे विषय होतेच, पण ‘56 इंच छाती’चा हवाला देऊन मोदी यांनी मोठी वक्तव्ये केली ती कश्मीरातील रक्तपात, दहशतवाद संपवण्यासाठी. काँगेस पुचाट म्हणून

कश्मीरचा प्रश्न

सुटला नाही असे जम्मू-श्रीनगरच्या भाषणात सांगण्यात आले, पण काल मेजर शशीधरन यांच्या बलिदानानंतर पुन्हा कश्मीरातील रक्तपाताचा प्रश्न उभा राहिला. श्री. मोदी यांनी रामलीलावरील भाषणात सांगितले की, ‘‘काँग्रेसने मला छळले!’’ स्वतःचे दुखणे बाजूला ठेवून देशाचे दुखणे दूर करतो तो राज्यकर्ता. पाकिस्तान छळत आहे व त्या छळात आमच्या जवानांचे बलिदान होत आहे ते आधी बघा. ‘‘चौकीदार एकालाही सोडणार नाही!’’ असेही पंतप्रधान म्हणतात. बरोबर आहे, एकालाही सोडू नका. त्याआधी पाकिस्तानला सोडू नका. आमचे तरुण लष्करी जवान जम्मू-कश्मीरमध्ये रोज मरत आहेत. या जवानांची छाती किती इंचांची ते माहीत नाही, पण ते कोणतेही रडगाणे न गाता लढत आहेत. काँग्रेसचे राज्य असतानाही लढत होते व आता मोदींचे राज्य आले तरीही त्यांची लढाई व हौतात्म्य संपलेले नाही. चौकीदाराने याची दखल घेतली पाहिजे. वीर जवानांना श्रद्धांजली वाहणे व मानवंदना देणे हा आता एक ‘राष्ट्रीय’ कार्यक्रम झाला आहे. वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात ज्यांना अभिमान आणि गर्व वाटतो त्या राज्यकर्त्यांनी शहीद मेजर शशीधरन नायर यांच्या घरी जाऊन त्यांची माता, पत्नी व बहिणीचा आक्रोश समजून घेतला पाहिजे. रडगाणे व आक्रोश यातला फरक जेव्हा कळेल तो सुदिन. मेजर शशीधरन माफ करा, जवानांचे बलिदान तसे व्यर्थच जात आहे. वीर जवानांनो, माफ करा!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा : शरद पवार अडचणीत येण्याची शक्यता ?

News Desk

“कर्नाटकने जे महाराष्ट्राचे रस्ते बंद केले त्याचे काय? त्यावर पण बोला”, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना सल्ला

Aprna

ठाकरे कुटुंबियांविरोधातील बेहिशेबी संपत्तीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

Aprna