HW News Marathi
राजकारण

दसरा मेळावा निमित्ताने ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना रंगणार; कोण बाजी मारणार, सर्वांचे लक्ष

मुंबई | देशभरात आज दसऱ्याची धुमधाम पाहायला मिळणार आहे. तर महाराष्ट्रासाठी आजचा दसऱ्याचा दिवस हा अत्यंत महत्वाचा असणार आहे. कारण राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांचा दसरा मेळवा (dussehra melava) होणार आहे. या मेळव्यात शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांमध्ये सभेच्या गर्दीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. ठाकरे गटाचा दसरा मेळवा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा बीकेसी मैदानावर होणार आहे. या दोन्ही गटाकडून  आज (5 ऑक्टोबर) होणाऱ्या दसरा मेळव्यासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन होणार आहे. आजच्या दसरा मेळाव्यात ठाकरे आणि शिंदे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिंदेंनी बंड केल्यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. शिवसेना कोणाची हा वाद सुरू आहे. तर पक्षचिन्हावर निवडणूक आयोग लवकर सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज होणाऱ्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचवरून दोन्ही गटात चढाओढ सुरू आहे. शिंदे गटाकडून बीकेसीवर होणाऱ्या मेळाव्यासाठी हजारो बस बुक करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे ठाकरेंचेही कार्यकर्ते सुद्धा मुंबईत दाखल झाले आहे.
शिंदे गटाकडून कार्यक्रर्त्यांसाठी अडीच लाख फुड पॅकेजच्या ऑर्डर

शिंदे गटाने बीकेसीवर होणाऱ्या मेळाव्यात त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांसाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी तब्बल दोन ते अडीच लाख फुड पॅकेटसची ऑर्डर दिली आहे. शिंदे गटाने ठाण्यातील प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानाला ही ऑर्डर देण्यात आली आहे. या फूड पॅकेट्समध्ये धपाटे, ठेपला, कचोरी, गुलाबजाम असे चविष्ट पदार्थ असणार आहेत. प्रत्येक शिवसैनिकाला बीकेसी मैदानावर मेळावा संपल्यानंतर हे फूड पॅकेट्स दिले जाणार आहेत.

 

Related posts

आज सादर होणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प 

News Desk

भारत मोदी मुक्तीसाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे | राज ठाकरे

News Desk

BharatBandh | भारत बंदला पुण्यात हिंसक वळण

News Desk