HW News Marathi
राजकारण

भाजपचे हे ‘टगे’ छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून आता शहाणपणा शिवतात! – संजय राऊत

मुंबई | “भाजपचे टगे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करून आता हीच मंडळी शहाणपणा शिकवत आहेत”, असा टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यपाल आणि भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी केल्या विधानावरून केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राऊतांनी आज (28 नोव्हेंबर) माध्यमांशी बोलताना हल्लाबोल केला.

राऊत म्हणाले, “पंडित नेहरूंकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला होता. परंतु, तेव्हा  नेहंरूनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी देखील मागितली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात बोलण्यात आणि लिखाणात चूक झाली, असे लक्षात आल्यावर पंतप्रधानपदी असलेल्या पंडित नेहरू यांनी माफी मागितली. यानंतर मोरारजी देसाईंचे महाराष्ट्राबाबत काही मतभेद, वादाचे मुद्दे होते. परंतु, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या चुकीच्या विधानावर त्यांनी देखील माफी मागितली होती. पण भाजपच्या नेत्यांकडूनच छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला जात आहे. आणि उलट भाजपचे टगे आता शहाणपणा शिकवत आहेत, हे महाराष्ट्रातील जनता पाहात आहे. देशातील महापुरुषांचा अपमान होत असताना भाजप-शिंदे सरकार हात चोळत बसले आहेत. देशातील कोणत्याही महान नेत्याचा अपमान होऊन, अशी आमची भूमिका राहलेली आहे.”

राजकारणात अजून किती दिवस आवाज काढत बसणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मेळाव्यातील मिमिक्रीसंदर्भात विचारल्यावर राऊत म्हणाले, “राजकारण म्हणजे मिमिक्री नव्हे, आम्ही मिमिक्री पाहायची असेल तर जॉनी लिव्हर यांची ओरिजनल मिमिक्री पाहू. राजकारणात अजून किती दिवस आवाज काढत बसणार?, असा सवाल राऊतांनी राज ठाकरेंना केला आहे. पुढे राऊत म्हणाले, आता मॅच्युर व्हा आणि प्रगल्भ राजकारण करा. आवाज काढणे आता खूप झाले. यांच्या परिकडे पाहायला हवे, हे संपूर्ण महाराष्ट्र पाहा. उद्धव ठाकरेंवर टीका करणे हे तुमचे राजकारण किती दिवस चालणार आहे?, ” अशी टीका त्यांनी केली.

 

 

 

Related posts

जाणून घ्या… पंतप्रधान नरेंद्र मोदींची किती आहे संपत्ती

News Desk

महाराष्ट्रातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी; काय निर्णय येणार, याकडे सर्वांचे लक्ष

Aprna

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात पोलिसांना यश

Chetan Kirdat