HW News Marathi
राजकारण

बेस्ट कर्मचाऱ्यांची माथी भडकवण्याचे काम शशांक राव यांनी केले !

मुंबई | मुंबई महापालिका आणि बेस्ट यामध्ये जेव्हा जेव्हा शिवसेची सत्ता होती. तेव्हा कामगार-बेस्ट संघर्षात शिवसेने महत्वाची भूमिका बजावली. कामगारांना न्याय मिळाला पाहिजे ही शिवसेनेची भूमिका असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केला आहे. परंतु काही लोक शिवसेनेला बदमान करण्याचे काम करत आहे. परब यांनी आज (१७ जानेवारी) पत्रकार परिषद घेऊन कामगार नेते शशांक राव यांच्यावर आरोप केले आहे.

परब म्हणतात की, कोर्टाने दिलेले आदेश आणि शशांक राव यांनी कामगारांना दिली माहितीमध्ये तफावत असून पालिकेमध्ये बेस्टचे विलीनीकरण करायचे आहे याचा ठराव पालिकेत अगोदरच झाला, परंतु शशांक राव यांच्या युनियनने याला कोर्टात आव्हान दिले. शिवसेनेने कामगारांच्या बाजुने जी भूमिका घेतली होती तीच भूमिका कोर्टाने घेतली आहे. जनतेला वेठीला धरू नये, कामगारांना नाहक त्रास होऊ नये ही शिवसेनेची भूमिका आहे. मात्र शशांक राव यांचे स्क्रीप्ट दुसऱ्या कुणीतरी लिहिले असावे.’

अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

  • शशांक राव यांचे स्क्रिप्ट दुसऱ्या कुणी तरी लिहिले असावे
  • कामगारांची ९ दिवस माथी भडकवण्याचे काम शशांक राव यांनी केले आहे.
  • संपामध्ये अदृश्य हात आहेत असे सांगितले गेले त्याच अदृष्य हाताचा वापर शिवसेनेला बदनाम करण्यासाठी केला गेला, आणि तोच त्यांचा राजकीय अजेंडा आहे.
  • नारायण राणे, कपिल पाटील, आशिष शेलार यानी संपात मदत केल्याचे राव यांनी सांगितले, त्यामुळे कुणाचे अदृश्य हात आहेत हे यावरून समोर आले आहेत.
  • स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी शशांक राव यांनी संप ताणला
  • शिवसेनेला कधी कुठल्या दबावाला बळी पडणार नाही
  • वडिलांनी शशांक राव यांना योग्य प्रशिक्षण दिले नसावे
  • शिवसेना कामगारांच्या पाठिशी ठाम आहे.
  • शिवसेना कामगाराना खोटे आश्वासन देणारे नाही
  • जनतेला वेठीला धरू नये, कामगारांना नाहक त्रास होऊ नये ही शिवसेनेची भूमिका आहे.
  • शशांक राव संप ताणत होते म्हणून आम्ही पाठिंबा काढून घेतला.
  • पगारात पुढच्या महिन्यात सात हजार वाढवून येतील त्यांनी पेमेंट स्लिप दाखवावी मी माझे शब्द मागे घेईन
  • संप मागे घेतला तेव्हा कोर्टाचे ऑर्डर हातात नव्हते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीत नेमके झाले काय

Aprna

सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश लेखी गुणांच्या आधारे व्हावेत !

News Desk

राम कदम यांची जीभ छाटणाऱ्याला पाच लाख रुपये | सुबोध सावजी

News Desk