मुंबई | देशविरोधी घोषणा देणारे मूठभर चळवळे त्यांना आवरत नाहीत व पराभूत करता येत नाहीत. याचा अर्थ या विद्यापीठात शैक्षणिक वातावरण उरले नसून देशद्रोही चळवळय़ांनी येथे वाळवी लावली आहे काय? त्यांचा नेता कन्हैया कुमार हा अचानक देशातील युवकांचा नेता बनतो, हे कसे? जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील मतदान ‘ईव्हीएम’द्वारे होत नसल्याने तेथील विजय मिळवणे अवघड झाले आहे काय? महाराष्ट्राचे एक मंत्री गिरीश महाजन यांनी कालच एका मुलाखतीत जाहीर केले, ‘मला कुठेही पाठवा, मी जादू दाखवीन. भाजपला विजयी करून दाखवीन.’ आमचे भाजपला आवाहन आहे, गिरीश महाजन यांच्यासारख्या कर्तबगार भाजप मंत्र्याला ‘जेएनयू’मध्ये मुक्कामाला पाठवा व देशद्रोह्यांचा पराभव घडवा. फक्त त्यांना इतकेच सांगा, ‘जेएनयू’मधील निवडणूक ईव्हीएमवर होत नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे.
सामनाचे आजचे संपादकीय
कन्हैया कुमार व त्याच्या दहाजणांच्या टोळीवर देशद्रोहाचा आरोप ठेवल्याने जे तथाकथित विचारवंत व मतस्वातंत्र्यवाले छाती पिटत आहेत त्यांचे रक्तगट तपासायला हवेत. मोदी यांच्या विरोधात हे लोक बोलतात म्हणून ते गुन्हेगार नाहीत, तर सार्वभौम संसद उडवण्याच्या कटाचा सूत्रधार असलेल्या अफझल गुरूच्या ‘झिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्यांविरोधात हे आरोपपत्र आहे. अर्थात भाजप तरी कोणत्या तोंडाने कन्हैया कुमारचा निषेध करणार? अफझल गुरूला स्वातंत्र्यवीर मानणाऱ्या मेहबुबा मुफ्तीसोबत सरकार स्थापनेचे महापाप भाजपने कश्मीरात केलेच आहे. तेव्हा कन्हैया कुमारवरील देशद्रोहाच्या आरोपांचे राजकीय भांडवल न करणे हेच भाजपच्या हिताचे आहे.
कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा आरोप ठेवल्यामुळे काही चळवळे वळवळू लागले आहेत. हे सर्व प्रकरण दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आहे. फेबुवारी 2016 मध्ये या विद्यापीठाच्या प्रांगणात संसदेवरील हल्लाप्रकरणी अफझल गुरूला फाशी दिल्याच्या विरोधात निषेध सभा घेण्यात आली होती. त्यात अफझल गुरूच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या गेल्या. तो दिवस गुरूचा स्मृतिदिवस म्हणून पाळला गेला. हे सर्व देशद्रोही कृत्य असल्याने कन्हैया कुमार, उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य व इतर 10 जणांवर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. या सगळय़ांना नंतर अटक झाली व आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे असल्याचे पोलीस सांगतात. जर हे पुरावे पक्के असतील तर कन्हैया कुमारच्या बाजूने उभ्या राहिलेल्या प्रत्येकाचेच थोबाड फुटले पाहिजे. बाराशे पानांचे आरोपपत्र आहे व त्यात अनेक देशविरोधी घोषणा, भाषणांचा समावेश आहे. ‘भारत तेरे तुकडे होंगे, इन्शाल्ला, इन्शाल्ला’, ‘कश्मीर की आझादी तक जंग रहेगी’ किंवा ‘भारत मुल्क को एक झटका और दो’ अशा घोषणा उन्मत्तपणे दिल्या गेल्या व त्याचे चित्रीकरण झाले आहे. हिंदुस्थानी सैन्याविरोधातही घोषणा देण्यात आल्या. त्याचे तीक्र पडसाद देशात उमटले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात माओवादी, नक्षलवादी, कश्मीर आझादीवाल्यांचा अड्डा आहे. मोदी व त्यांच्या भाजपने
देश जिंकला असला तरी
त्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठावर झेंडा फडकवता आला नाही. तेथील विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा नेहमीच दारुण पराभव होतो. देशविरोधी घोषणा देणारे मूठभर चळवळे त्यांना आवरत नाहीत व पराभूत करता येत नाहीत. याचा अर्थ या विद्यापीठात शैक्षणिक वातावरण उरले नसून देशद्रोही चळवळय़ांनी येथे वाळवी लावली आहे काय? त्यांचा नेता कन्हैया कुमार हा अचानक देशातील युवकांचा नेता बनतो, हे कसे? जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील मतदान ‘ईव्हीएम’द्वारे होत नसल्याने तेथील विजय मिळवणे अवघड झाले आहे काय? महाराष्ट्राचे एक मंत्री गिरीश महाजन यांनी कालच एका मुलाखतीत जाहीर केले, ‘मला कुठेही पाठवा, मी जादू दाखवीन. भाजपला विजयी करून दाखवीन.’ आमचे भाजपला आवाहन आहे, गिरीश महाजन यांच्यासारख्या कर्तबगार भाजप मंत्र्याला ‘जेएनयू’मध्ये मुक्कामाला पाठवा व देशद्रोह्यांचा पराभव घडवा. फक्त त्यांना इतकेच सांगा, ‘जेएनयू’मधील निवडणूक ईव्हीएमवर होत नाही. आता कन्हैया कुमार व त्याच्या दहाजणांच्या टोळीवर देशद्रोहाचा आरोप ठेवल्याने जे तथाकथित विचारवंत व मतस्वातंत्र्यवाले
छाती पिटत आहेत
त्यांचे रक्तगट तपासायला हवेत. मोदी यांच्या विरोधात हे लोक बोलतात म्हणून ते गुन्हेगार नाहीत, तर हिंदुस्थानची सार्वभौम संसद उडवण्याच्या कटाचा सूत्रधार असलेल्या अफझल गुरूच्या समर्थनाच्या, त्याच्या ‘झिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्यांविरोधात हे आरोपपत्र आहे. मुंबईवर हल्ला करणाऱ्या कसाब व संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूसाठी ज्यांचे हृदय धडधडत आहे त्यांनी या देशातून चालते व्हावे. कसाबला हिंदुस्थानी न्यायालयाने बचावाची पूर्ण संधी दिली. कन्हैया कुमार व त्याच्या टोळीसही ती मिळेल. पोलिसांनी सादर केलेले पुरावे बनावट असतील तर ते न्यायालयात टिकणार नाहीत. कन्हैया कुमार बोलतो छान. तो देशातील बंडखोर, बेरोजगार तरुणांचा प्रतिनिधी आहे, पण म्हणून अफझल गुरू झिंदाबाद व कश्मीर आझादीचे नारे त्याला देता येणार नाहीत. अर्थात भाजप तरी कोणत्या तोंडाने कन्हैया कुमारचा निषेध करणार? अफझल गुरूला स्वातंत्र्यवीर मानणाऱ्या, हुतात्मा ठरवणाऱ्या मेहबुबा मुफ्तीसोबत सरकार स्थापनेचे महापाप भाजपने कश्मीरात केलेच आहे. तेव्हा कन्हैया कुमारवरील देशद्रोहाच्या आरोपांचे राजकीय भांडवल न करणे हेच भाजपच्या हिताचे आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.