HW News Marathi
राजकारण

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोस्टरलावून सेनेला घरचा आहेर

मुंबई | घाटकोपरमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. जुन्या शिवसैनिकांना प्राधान्य देण्यापेक्षा नव्याने पक्षात आलेल्या लोकांना पद देण्यात आले. यावरुन घाटकोपर पश्चिममधील शाखा क्रमांक १२९ च्या बाहेर दोन दिवसांपूर्वी शिवसैनिकांच्या दोन गटात मारामारी झाल्याची घटना घडली होती. गेल्या सहा वर्षापासून प्रदीप मांडवकर या विभागाचे शाखाप्रमुख होते. मात्र नव्या नियुक्त्यांनंतर शिवाजी कदम यांना शाखाप्रमुख पदी निवड केल्यामुळे हा वाद पेटला.

शिवसेनेत बाहेरुन पक्षात आलेल्या शिवाजी कदम यांना शाखाप्रमुख पद दिल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. यातूनच मांडवकर आणि कदम यांच्या गटांमध्ये भांडण झाले. यानंतर शिवसैनिकांनी होर्डिंगच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली. नाराज शिवसैनिकांनी घाटकोपरमध्ये होर्डिंगतून ‘राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना पक्षात घेण्याऐवजी राज ठाकरेंनाच पक्षात का घेत नाही?’ अशी खोचक टीका करुन शिवसैनिकांनी सेनेला घरचा आहेर दिला आहे.

  • काय लिहिलेय पोस्टरवर?

ईशान्य मुंबई विभाग प्रमुख मा. श्री. राजेंद्र राऊत साहेब यांच्या धोरणानुसार ईशान्य मुंबई विभाग क्र. ८ च्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची उपविभाग प्रमुख, विधानसभा संघटक, सहसंघटक व शाखाप्रमुख यांची यादी नुकतीच जाहीर झाली. त्याचवेळी लक्षात आले की, यातील नियुक्त्या करण्यात आलेले बरेच जण अनेक पक्ष फिरुन संघटनेच्या विरोधात निवडणूक लढवून किंवा विरोधात काम करणाऱ्यांना मा. विभाग प्रमुखांनी संघटनेची सन्मानाची पदे बहाल केली आहेत. याचा अर्थ असा होतो की सध्या शिवसेनेत या पदांच्या लायकीचा निष्ठावंत शिवसैनिक या पदाच्या लायकीचे नाही. त्यामुळे मा. राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून आलेल्या लोकांना महत्त्वाचे पदे बहाल करण्यात आली. त्या ऐवजी मा. राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही?

  • इतर पक्षातून आलेल्या पदाधिकाऱ्यांची सध्याची पदे व पूर्वीचे पक्ष पुढीलप्रमाणे

मा. बाबू दरेकर (उपविभागप्रमुख) – पूर्वी – मनसे

मा. विजय पडवळ (उपविभागप्रमुख)- पूर्वी – मनसे भाजप

मा. ज्ञानेश्वर वायाळ (विधानसभा संघटक) – पूर्वी – मनसे

मा. बाबू साळुंखे (शाखाप्रमुख) – पूर्वी – मनसे/राणे समर्थक

मा. शिवाजी कदम (वय वर्ष 65 शाखाप्रमुख) पूर्वी – मनसे

मा. नाना ताटेले (शाखाप्रमुख) – पूर्वी – राष्ट्रवादी-मनसे-भाजप

मा. शरद कोथरे (शाखाप्रमुख) – पूर्वी – मनसे

‘या यादीवरुन माझ्यासारख्या निष्ठवंत शिवसैनिकाच्या लक्षात आले की, संघटनेला निष्ठवंत नकोत. तर चार ते पाच पक्ष फिरुन येणारे हवेत, मग तर चला आपण सुद्धा चार घरे फिरु न येवू या… आपला बाळासाहेबांचा निष्ठवंत शिवसैनिक….’ असे या पोस्टरवर एका निष्ठवंत शिवसैनिकांनी सेने सुरु असलेल्या गैरकारभार खुद्द सेनेच्या कार्यकत्यांनी उघडकीस आणला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यातील एका झोपडीतून मोठा शस्त्रसाठा जप्त

News Desk

ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी छिंदमवर गुन्हा दाखल

News Desk

…कि लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार ?, भाजपविरोधात राष्ट्रवादीची बॅनरबाजी

News Desk