HW News Marathi
राजकारण

LIVE UPDATES | शिवतीर्थावरुन शिवसेनेचा दसरा मेळावा-२०१८

मुंबई | सालाबाप्रमाणे यंदाही शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दादर स्थित शिवाजी पार्कमध्ये शिवसैनिकांची गर्दी होऊ लागली आहे. दरम्यान, शिवाजी पार्कवर जमलेल्या शिवसैनिकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.

केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेला मित्रपक्ष भाजपासोबत ताणलेले संबंध, आगामी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा, राफेल विमान करार अशा अनेक मुद्द्यांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

LIVE UPDATES

युती तोडताना मी बोललो होतो. शिवसेना ही मर्दांची सेना आहे – ठाकरे

मीटू मीटू नका करु कानाखाली जाळ काढा, शिवसैनिक तुमच्या सोबत आहे.

मीटू चे वादळ भयानक आहे.

माता भगिनींची विक्री सरकार बदलून देखील होत असेल तर हे मोठे दुर्दैव.

तुम्ही म्हणाल तेव्हा पाकिस्तान मित्र , तुम्ही म्हणाल तेव्हा पाकिस्तान शत्रू, सर्जिक स्ट्राइक वरुन उद्धव यांनी साधला निशाणा.

सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान शिल्लक राहिला नसता – ठाकरे

जर सरकारने मंदीर बांधले नाही, तर हे तमाम हिंदू एकत्र येऊन मंदीर बांधतील – ठाकरे

पंतप्रधान इतक्या दिवसात आयोध्येत का गेले नाहीत – ठाकरे

येत्या २५ नोव्हेंबरला मी आयोध्येत जाणार, हेच प्रश्न तिथून मोदींना विचारणार, राम मंदीर कधी बांधणार. गरीब जनाता तुमच्याकडे आशेने बघते आहे – ठाकरे

मी आयोध्येला जाणार – ठाकरे

राष्ट्रपती निवडणुकीत बाबरीचे प्रकरण वरती येते – ठाकरे

मोहन भागवतांच्या वक्तव्याचे केले कौतुक.

खोट बोलूण सत्ता मिळेल, पण देश ज्वालामुखीत जात आहे – ठाकरे

निर्लज्जपणा महाराष्ट्राच्या रक्ताला शोभत नाही.

शब्द पाळने ही शिवसेना प्रमुखांची शिक्षण.

खोट बोलणे हे मराठी माणसाच्या रक्तातचं नाही.

नितीन गडकरींच्या वक्तव्याचा समाचार.

मोदीं यांच्या विष्णुच्या आवतारावर ठाकरेंचा भाजप नेत्याला टोला

महागाई रोखता येत नसेल तर सत्तेत काय करताय – ठाकरे

मगरुर रविशंकर शर्मा- – ठाकरे

पेट्रोलचे भाव म्हणजे जनतेची थट्टा – ठाकरे

वाघाचा आवाज बंद करण्याची हिम्मत कुणामध्ये आहे- ठाकरे

आवाज वाढविण्याची दिली सुचना.

आवाजावरुन सरकारला टोला.

प्रमोद महाजन यांच्या सोबतच्या आठवणी केल्या जाग्या.

अटलजी म्हणायचे सरकार टिकले नाही तरी चालेल, पण देश टिकायला हवा.

भावी पंतप्रधान माझ्या पर्यंत चालत आले, अटलजींचे खूप मोठे मन, तितकाच नम्रपणा होता.

अटलजींचा नम्रपणा, ते स्वता उठून माझ्या पर्यंत आले… विमानातल्या आठवणी केल्या शेअर.

अटलजी, आडवाणी, प्रमोदजी यांच्या सोबत माझे कौटुंबीक ऋणानुबंध.

आम्ही सत्ता मिरवायला एकत्र आलो नव्हतो.

शिवसेना भाजप युती २५ वर्षांची.

अटलजी यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही.

सरकारचा भोंगळ कारभार बघून बोलायचे नाही तर काय करायचं.

ज्यांच्या हातात झेंडा देता, त्यांच्या हातात दांडा देखील असतो.

कर्नाटक सरकारने दुष्काळ जाहीर करुन टाकला, महाराष्ट्र सरकार कधी करणार

कर्नाटक सरकार कसेही असो, पण आज शिवसेनेचे मंत्री कर्नाटकमध्ये जाऊन दौरा करत आहेत.

२०१४ ला असलेले हवा आता थोड्या प्रमाणात कमी झाली आहे.

तुम्ही संघाला भाजपपासून विभक्त होण्याचा सल्ला का नाही देत.

भाजपाला सत्तेत आणण्यात संघाटा मोठा वाटा.

जसे आम्हाला प्रश्न विचारता तसे संघाला का नाही विचारत ?

जसे शिवसेना बोलते तसेच हल्ली संघ देखील बोलत आहे.

जो कारभार देशात सुरु आहे तो तुम्हाला मान्य आहे का ?

जे पटत नाही ते मी बोलणारचं.

धनुष्यबाण पेलवायला ५६ इंच छाती नव्हे तर, कणखर मनगाटाची गरज आहे.

दरवर्षी रावण उभा रहातो राम मंदीर कधी उभे रहाणार.

आम्हाला संपवून उभ कोण रहातं तेच पहातो.

सत्तेशिवाय लढण्याचा मी बाळासाहेबांची परंपरा कायम ठेवली आहे.

गर्व से कहो हम हिंदू है.

बाळासाहेब मैदानात बोलत होते, घरी नाही.

आजही देशातला हिंदू मेलेला नाही तो आजही जागा आहे.

माझे कर्तुत्व शुन्य, जी आहे ती बाळासाहेब आणि मॉ साहेबांची पुण्याई

दसरा मेळाव्याचे ५२ वे वर्ष.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला थोड्याच वेळात सुरुवात

उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला थोड्याच वेळात सुरुवात होणार.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्धार !

News Desk

मोदींनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा, ३० मे रोजी शपथविधी सोहळा

News Desk

‘शिवतीर्था’वर ऐकू येणार मोदींचा आवाज; राज ठाकरेंना मुनगंटीवारांकडून स्पेशल गिफ्ट

Manasi Devkar