HW News Marathi
राजकारण

शिवराजसिंह चौहान यांची दुतोंडी भूमिका ?

भोपाळ | ‘कर्म किसी का पीछा नहीं छोड़ता…’ असे म्हणत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटरच्या माध्यमातून कमलनाथ यांच्यावर खोचक टीका केली होती. १९८४ साली झालेल्या शीख दंगली प्रकरणी कमलनाथ यांचे नाव पुढे असल्याने भाजपकडून कमलनाथ यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. आश्चर्य म्हणजे ही टीका केल्यानंतर शिवराजसिंह हे कमलनाथ यांच्या नुकत्याच पार पडलेल्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले.

कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला शिवराजसिंह यांनी केवळ आपली उपस्थितीच दर्शविली नाही तर कमलनाथ आणि ज्योतीरादित्य सिंधिया यांच्यासह हात उंचावून त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. शिवराजसिंह चौहान यांच्या अशा दुतोंडी भूमिकेमुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. शिवराजसिंह यांनी कमलनाथ यांच्यावर टीका केल्यानंतर ते कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली. त्यानंतर त्यांनी आणखी एक ट्विट करत कमलनाथ यांना त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या. दरम्यान, १९८४ च्या शीख दंगल प्रकरणी कमलनाथ यांचे नाव पुढे येत असल्याने त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : माध्यमांनाच माझ्या राजीनाम्याची जास्त घाई !

News Desk

पंढरपूरच्या सभेतून शिवसेना फुंकणार निवडणुकीचे रणशिंग

News Desk

मी तुम्हाला ‘चौकीदार’ची टोपी आणि शिटी देतो !

News Desk