HW News Marathi
राजकारण

युतीच्या घोषणेपूर्वीच शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना अद्याप भाजप-शिवसेना युतीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. असे असताना आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मात्र आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरेंकडून औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघातून संजय शिरसाट, कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा विद्यमान आमदार आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना शिवसेनेकडून एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. अद्याप युतीची घोषणा झालेल्या नसताना शिवसेनेकडून होणाऱ्या या एबी फॉर्मच्या वाटपामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘गोपालगंज ते रायसीना’ असे लालू यादवांचे आत्मचरित्र प्रसिद्ध होत आहे !

News Desk

महिला आयोगाने चित्रा वाघ यांना खडसावले; दोन दिवसात उत्तर द्या नाही तर…

Aprna

पुढच्या ४८ तासांत युतीबाबत निर्णय घ्या अन्यथा… !

News Desk