HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

बाजीप्रभूंनी रक्त सांडले पण तुमची अक्कल उतू गेली !

संगमनेर ।“ते (बाळासाहेब थोरात) म्हणतात की मी बाजीप्रभू देशपांडे आहे. पण बाजीप्रभूंनी रक्त सांडलं यांनी काय सांडले ? त्यांची अक्कल उतू गेली आणि ती सांडली. थोरात साहेब तुम्ही देखील घरी बसायला हरकत नाही. कारण तुमचा नेता बँकाँकला बसला आहे”, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेसचे विधानसभेचे संगमनेर मतदारसंघाचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे आज (९ ऑक्टोबर) आपल्या संगमनेरमधील सभेत बोलत होते.

संगमनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार साहेबराव नवले यांना काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांचे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी नवलेंना की विचारलं तुमच्या विरुद्ध कोण आहे माहीत आहे का ? तर ते म्हणाले की, बाळासाहेब थोरात आहेत. तरीही मी ‘जोरात’ आहे. हा किस्सा सांगितल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पुढे बाळासाहेब थोरात यांच्यावर ही बोचरी टीका देखील केली.

विधानसभा निवडणूक अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपलेली असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. सर्वच राजकीय पक्ष हे आता निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. आज राज्यभरात अनेक राजकीय पक्षांच्या अध्यक्षांच्या प्रचारसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या देखील आज दिवसभरात एकूण ४ सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर, उध्दव ठाकरे संगमनेरमध्ये आपले उमेदवार साहेबराव नवले यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

Related posts

राधाकृष्ण विखे- राम शिंदे यांच्यात दिलजमाई ?

News Desk

#MarathaReservation : आरक्षणाआधीच भाजपला श्रेय लाटण्याची घाई

News Desk

अनिल अंबानींकडून काँग्रेस, नॅशनल हेरॉल्डविरुद्धचा मानहानीचा खटला मागे

News Desk