HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

विधानसभेत १४४ जागांसाठी शिवसेना आग्रही ?

मुंबई | लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर आता भाजप आणि शिवसेनेला येत्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. येत्या विधानसभा निवडणुकांसाठी २८८ जागांपैकीभाजप-शिवसेनेला प्रत्येकी १४४ जागा मिळाव्यात यासाठी शिवसेना आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. “महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांपैकी भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष प्रत्येकी १३५ जागा लढवतील तर मित्रपक्षांना १८ जागा दिल्या जातील”, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. मात्र, शिवसेना १३५ जागांसाठी तयार नसून १४४ जागांसाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, भाजपकडून अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

“भाजपच्या मित्रपक्षांनी विधानसभेत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे भाजपच्या वाट्याला १३५ अधिक मित्रपक्षांची सोडलेल्या १८ जागा मिळून एकूण १५३ जागा येतात. परंतु, भाजप सोडला तर शिवसेनेचा कोणताही मित्र पक्ष नसल्याने एकूण २८८ पैकी भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी १४४-१४४ जागांचे समसमान वाटप व्हावे”, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या या भूमिकेमुळे पुन्हा युतीत जागावाटपावरून वाद निर्माण होणार कि या प्रश्न सामंजस्याने सोडविला जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Related posts

RamMandir : उद्धव ठाकरे ‘लक्ष्मण किला’ येथे पोहोचले

News Desk

 कडकनाथ कोंबडीपालन घोटाळा : पोलिसांकडून २ संस्थापकांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

News Desk

मोदी सरकारच्या विमान प्रवास खर्चात लक्षणीय घट

News Desk