HW News Marathi
राजकारण

औरंगाबादमध्ये शिवसेना नगरसेवकावर तरुणांकडून हल्ला

औरंगाबाद | औरंगाबाद येथील गजानन नगरमधील शिवसेना नगरसेवक आत्माराम पवार यांच्यावर आज (मंगळवार) सकाळी अज्ञात तरुणांनी हल्ला केला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेना नगरसेवक आत्माराम पवार यांना याहल्ल्यात गंभीर जखमा झाल्या आहेत. पवार यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

मिळालेल्या माहिती नुसार गजानन नगर येथील शिवसेना नगरसेवक आत्माराम पवार यांच्या घरासमोर काल (सोमवार) रात्री काही मुलांचा घोळका उभा होता. त्यांच्यात काही वाद सुरु होता. आत्माराम पवारांनी त्या मुलांना समजावून सांगितले. यावेळी वातावरण तापले. या वादातूनच आज सकाळी पवार यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

वर्षा गायकवाड यांचा पूरग्रस्त भागात दौरा, कार्यकर्त्यांनी वाजवले फटाके

News Desk

आरक्षणाचा लढा जिंकण्यासाठी आंदोलकांनी अहिंसा आणि शांततेचा मार्ग अवलंबावा

News Desk

…तरचं हार्दिक पटेल पिणार पाणी 

News Desk
राजकारण

…त्या दिवशी पंतप्रधान मोदींना तुरुंगात जावे लागेल !

Gauri Tilekar

इंदूर | नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा राफेल कराराच्या मुद्द्यावर वक्तव्य केले आहे. “ज्या दिवशी राफेल विमान कराराची चौकशी होईल त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुरुंगात जावे लागेल” असे धक्कादायक वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. “मोदी यांना केवळ भ्रष्ट म्हटले जात नाही तर ते खरोखरच भ्रष्ट आहेत. याबाबत कोणतीही शंका असता कामा नये” असेही राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले आहे.

”ज्या दिवशी राफेल करार प्रकरणाची चौकशी सुरू होईल त्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुरुंगात जावे लागेल. राफेल हे भ्रष्टाचाराचे एक मोठे प्रमाण आहे. आपले मित्र अनिल अंबानी यांचा फायदा करवून देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी अनेक नियम आणि कायद्यांचा भंग केला आहे. राफेल कराराव्यतिरिक्त देखील अनेक मोठी प्रकरणे आहेत”, असेही राहुल गांधी म्हणाले आहेत. त्याचप्रमाणे फ्रान्समध्ये देखील राफेल कराराची चौकशी सुरू होण्याचे शक्यता असल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे.

Related posts

शिवसेनेचा 56 वर्धापन दिन हॉटेल वेस्ट इनमध्ये होणार साजरा; उद्धव ठाकरे काय बोलणार?

Aprna

सातव्या वेतन आयोगाचे ‘न्यू ईयर गिफ्ट’ कर्मचाऱ्यांना खरोखरच मिळेल का ?

News Desk

काँग्रेसमध्ये मेहनत करणाऱ्यांपेक्षा गुंडांना महत्व दिले जाते, प्रियांका चतुर्वेदींचा घरचा आहेर

News Desk