HW Marathi
राजकारण

शिवसेना पवारांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देईल !

मुंबई | शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. शरद पवार हे जर पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार असतील तर शिवसेना त्यांना नक्कीच पाठिंबा देईल, असे विधान छगन भुजबळ यांनी केले आहे. शिवसेना मराठीच्या मुद्यावर कायम सकारात्मक भूमिका घेत आली आहे. त्यामुळे जर शरद पवार पंतप्रधान होणार असतील तर शिवसेना त्यांना नक्की पाठिंबा देईल, असे भुजबळ म्हणाले.

प्रतिभाताई पाटील यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीलाही शिवसेनेचा पाठिंबा होता. त्यामुळे शरद पवार यांच्यासाठी देखील शिवसेना पक्षातील मतभेद सोडून आपला पाठिंबा जाहीर करतील, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

Related posts

#Article370Abolished : भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील आज काळा दिवस !

News Desk

माझ्या मनात ईव्हीएमबाबत कोणतीही शंका नाही !

News Desk

सोमवारपासून जम्मू-काश्मीरमधील काही निर्बंध होणार शिथिल

News Desk