मुंबई | मोदी सरकारविरोधात तेलुगू देसम पक्षाबरोबर मिळून काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठरावावर आज लोकसभेत चर्चा होणार आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना सध्या वेग आल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेना अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान करणार असल्याची चर्चा असतानाच शिवसेना अविश्वास ठरावाच्या बाजूनेही मतदान करू शकते अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या खासदारांना दिल्लीत उपस्थित राहण्यास बजावले आहे. मोदी सरकारविरोधात दाखल झालेल्या अविश्वास ठरावावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवारी (आज) अंतिम भूमिका स्पष्ट करणार आहेत अशी माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. तत्पूर्वी व्हीप बजावत शिवसेनेच्या खासदारांना एनडीए सरकारच्या बाजूने मतदान करण्यास सांगण्यात आले होते.
Chandrakant Khaire, Shiv Sena Chief whip in Lok Sabha to ANI says that there was no whip issued to vote one way or another. Notice has been given to be present in Parliament. Party chief Uddhav Thackeray will take final decision. #NoConfidenceMotion pic.twitter.com/ozDr0EtLlT
— ANI (@ANI) July 19, 2018
सर्व खासदारांना दिल्लीत उपस्थित राहण्यास सांगितले आहे. तसेच पक्षाची भूमिका शुक्रवारी सकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः स्पष्ट करतील अशी माहिती उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांकडून मिळत आहे. शिवसेनेचे लोकसभेतील खासदार चंद्रकांत खैरेंनीही व्हीपच्या मुद्द्यावर खुलासा केला आहे. व्हीप(नोटीस)मध्ये पक्षाच्या खासदारांना दिवसभर संसदेत उपस्थित राहण्यास सांगितले असल्याचे खैरेंनी स्पष्ट केले आहे.
या ठरावाला अण्णा द्रमुक हा पक्ष पाठिंबा देणार नाही तसेच तेलंगणा राष्ट्र समिती आणि शिवसेना देखील या ठरावाला पाठिंबा देण्याची शक्यता प्रचंड कमी असल्याचा अंदाज बांधला जात आहे. बिजू जनता दल आपली भूमिका शुक्रवारी (आज) जाहीर करणार असून तेलंगणा राष्ट्र समिती आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष कदाचित मतदानात भागच घेणार नाहीत, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.