HW News Marathi
राजकारण

राधाकृष्ण विखे पाटील यांना कारणे दाखवा नोटीस

मुंबई | काँग्रेसने ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना आता कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. काहीच दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा मंजूर केल्यानंतर काँग्रेसने त्यांना आता कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संगमनेर येथे शुक्रवारी (२६ एप्रिल) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रचारसभा घेतली. दरम्यान, एकीकडे राहुल गांधी यांची संगमनेर येथे प्रचार सभा सुरु असताना राधाकृष्ण विखे पाटील हे शिवसेनेचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी प्रचार करत होते

याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने राधाकृष्ण विखे पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी केवळ आपल्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. अद्याप त्यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला नाही. तरीही, राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या युतीच्या प्रचारात सक्रिय असल्याचे दिसत आहे. दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील हे लवकरच काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डीतील शिवसेना उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार सभेत उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता ‘त्यांना’ स्वतःला भाजपमध्ये जाण्याचा अनुभव घ्यायचा असेल !

News Desk

एक्झिट पोलच्या माध्यमातून हजारो ईव्हीएम्समध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न !

News Desk

आघाडी सरकारला आगामी लोकसभा निवडणुकीत यश मिळणार !

News Desk