HW News Marathi
राजकारण

सिद्धू पाकिस्तानचे एजंट | हरसिमरत कौर

नवी दिल्ली | कर्तारपूर कॉरिडोर पायाभरणीच्या कार्यक्रमानंतर पाकिस्तानहून परतलेले पंजाबचे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर अकाली दलाने हल्लाबोल केला आहे. अकाली दलाच्या नेत्या आणि मोदी सरकारमधील मंत्री हरसिमरत कौर यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांना पाकिस्तानचे एजंट असल्याचे म्हटले आहे.

खलिस्तानी नेता गोपाल चावला यांच्यासोबतचा सिद्धूंचा फोटो समोर आल्यावरुन बोलताना कौर म्हणाल्या सिद्धूंचा फोटो एका दहशतवाद्यासोबत दिसतो. पाकिस्तानात गेल्यापासून ते पाकिस्तानचे एजंट बनलेत. आमच्या जवानांची हत्या करणाऱ्या बाजवाची ते गळाभेट घेतात. पाकिस्तानात तीन दिवस सिद्धू त्यांच्यासोबतच होते. काँग्रेसची दुटप्पी भूमिका समोर आलीये, राहुल गांधींनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, असेही त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, “चावला किंवा चिमा यांना मी ओळखत नाही. पाकिस्तानात माझ्यासोबत ५ ते १० हजार फोटो काढण्यात आले, त्यामध्ये चावला किंवा चीमा कोण आहे त्याला मी ओळखत नाही”, असे स्पष्टीकरण सिद्धू यांनी पाकिस्तानातून परतल्यानंतर दिले आहे. भारत आणि पाकिस्तान सरकारने चांगला निर्णय घेतला. “कर्तारपूर कॉरिडोर हा देवाने बनवलेला रस्ता आहे”, अशा शब्दात काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात निवडणुकीदरम्यान ‘या’ घटनांमळे निर्माण झाला तणाव

News Desk

वादग्रस्त विधान करण्याचा राज्यपालांचा लौकिक; समाजात गैरसमज वाढेल कसा हेच मिशन! – शरद पवार

Aprna

ममाताजी, ‘जय श्रीराम’ची घोषणा पाकिस्तानमध्ये द्यायची का ?

News Desk