HW News Marathi
राजकारण

…तर मग टीका सोसवायची तयारी ठेवा, शिवसेना पुन्हा आक्रमक

मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला होता. त्यानंतर, अमृता फडणवीस यांच्या उद्धव ठाकरेंवरील टीकेनंतर शिवसेना प्रचंड आक्रमक झाली. पिंपरी येथे महिला शिवसैनिकांनी अमृता फडणवीस यांच्या विरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन केले. “राघोबादादा तुमच्या आनंदीबाईंना आवरा”, अशा घोषणा देत आणि अशा आशयाचा मजकूर असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचा फोटो असलेले पोस्टर्स घेऊन शिवसैनिकांकडून हे आंदोलन करण्यात आले. अमृता फडणवीस यांनीच या आंदोलनाचा व्हिडीओ शेअर करत शिवसेनेवर पुन्हा एकदा टीका केली. त्यानंतर, पुन्हा शिवसेनेने त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

शिवसेनेच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत अमृता फडणवीस यांनी शायरीच्या माध्यमातून शिवसेनेला प्रत्युत्तर दिले. “दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका, हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे !”, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले. दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या या ट्विटनंतर युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी त्यांना लक्ष्य केले आहे. “गेल्या ५ वर्षात आपण महाराष्ट्राला आपल्यावर टीका करायच्या अनेक संध्या दिल्या पण शिवसेनेने कधी ही वैयक्तिक टीका केली नाही कारण आपण राजकारणात नव्हतात. आता जर तुम्हाला कंठ फुटला असेल तर मग टीका सोसवायची तयारी ठेवा. देवेंद्र फडणवीस ह्यांचे पण हेच मत असल्याचे समजते”, असे ट्विट वरुण सरदेसाई यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राफेल डीलची ऑडिओ क्लिप खरी | राहुल गांधी

News Desk

हे अपत्य जन्माला घालायला भाजपला ४ वर्षे लागली !

News Desk

परळीचा आमदार मीच | धनंजय मुंडे

News Desk