HW News Marathi
राजकारण

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

सोलापूर | विविध विकास कामांच्या भूमिपूजन तसेच उद्घाटन कार्यक्रमांसाठी आज (९ जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याला सुरुवात झाली असून सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. सोलापुरातील पार्क चौकातील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये पंतप्रधान मोदींची सभा सुरु आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरातील जनतेला संबोधित करीत आहेत. पंतप्रधान मोदींच्या या सभेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल के. विद्यासागरराव आणि अन्य नेतेमंडळी देखील उपस्थित आहेत.

विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली आहे. “लाखो वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेले श्री विठ्ठल-रुक्मिणी, सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर, अक्कलकोटचे श्री स्वामीसमर्थ यांना मी साष्टांग नमस्कार करतो. डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या सोलापूर भूमीत आपण सर्व मला आशीर्वाद द्यायला जमलात त्याबद्दल मी आपल्याला अभिवादन करतो”,असे म्हणत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप-शिवसेनेचं जमलंच ! हिंदुत्त्वासह लोकांच्या भावनेचा मुद्दा पुढे करून पुन्हा युती

News Desk

येत्या ९० दिवसांत मुंबई शहरातील पायाभूत सुविधांचा विकास करून शहराचा कायापालट करण्याचे नियोजन! – मुख्यमंत्री

Aprna

राहुल गांधींनी घेतले आरएसएसवर तोंडसुख

News Desk