HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

एखाद्याने पंतप्रधान मोदींवरील प्रेमापोटी अशा प्रकारे प्रचार केला असेल !

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपकडून सर्जिकल स्ट्राईकचा पुरेपूर राजकीय फायदा घेतला जात असल्याची बाब मंगळवारी (९ एप्रिल) काँग्रेसकडून उघड करण्यात आली. भाजपने छापलेले सर्जिकल स्ट्राईकचे चित्र असणारे इलेक्ट्रॉनिक कार्ड उघडल्यानंतर पंतप्रधान मोदींचा आवाज त्याचप्रमाणे कमळाचे चिन्ह दाबा, असे स्पष्ट आवाहन केले आहे. दरम्यान, भाजपकडून हा संपूर्ण प्रकार नाकारण्यात आला आहे. या प्रचारयंत्रणेशी भाजपचा कुठलाही संबंध असून निवडणूक आयोगाकडून याची चौकशी करुन कारवाई केली जाईल, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटले आहे.

“एखाद्याने पंतप्रधान मोदी यांच्यावरील प्रेमापोटी अशा प्रकारे प्रचार केला असेल. भारतीय निवडणूक आयोगाकडून याबाबत योग्य ती दखल घेऊन कारवाई केली जाईल. या प्रचाराशी भाजपचा काहीही नाही”, असे देखील विनोद तावडे यांनी यावेळी म्हटले आहे. भारतीय निवडणूक आयोगाने वारंवार बजावून देखील भाजपकडून प्रचारासाठी भारतीय जवान, सर्जिकल स्ट्राईकचा वापर केला गेला. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकासह काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आणि राजू वाघमारे यांनी धाड टाकली, त्यावेळी हा प्रकार समोर आला. दरम्यान, अशा प्रकारची तब्बल ५००० इलेक्ट्रॉनिक कार्ड्स छापली गेल्याची देखील माहिती मिळत आहे.

Related posts

राफेल प्रकरणात लपवण्यासारखे आता काहीच उरले नाही !

News Desk

आता आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा खटाटोप

News Desk

प्रकाश आंबेडकर व ओवेसी यांनी एकत्र येऊन नवे डबके तयार केले | ठाकरे

News Desk