तिरुवनंतपुरम | दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार मोहनलाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. मोहनलाल हे 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी भाजपत प्रवेश करू शकतील अशी शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. तसेच ते भाजपाच्या बाजूने लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. या भेटीची माहिती पंतप्रधान मोदींनी यांनी ट्वीट करून दिली.
मोहनलाल हे भाजपकडून तिरुवनंतपुरम लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे शशी थरूर यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. केरळ राज्यात भाजपचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मोहनलाल यांचा भाजप प्रवेश नक्कीच फायदेशीर ठरू शकतो, असेही म्हटले जात आहे. मोहनलाल यांच्या भाजप प्रवेशासाठी आरएसएसकडून दीर्घकाळापासून प्रयत्न सुरू आहेत.
केरळमध्ये झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली होती. राजशेखरन त्यांना पर्याय म्हणून तिरुवनंतपुरम मतदारसंघातून मोहनलाल निवडणूक लढवणार आहेत.
Malayalam superstar Mohanlal met Prime Minister Narendra Modi yesterday in Delhi. pic.twitter.com/eSrHnpGXyZ
— ANI (@ANI) September 4, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.