HW News Marathi
राजकारण

राज्यपालांनी माफी मागितली नाही यांची खंत! – उदयनराजे भोसले

मुंबई | राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानावर माफी मागितली नाही यांच खंत आहे, असे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर म्हणाले. राज्यपालांना पदावरून हटवण्यासाठी राष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयात पत्र ठाविले असल्याचे यावेळी उदनराजेंनी सांगतले. या पार्श्वभूमीवर भाजपच्या खासदारांसह उदयनराजेंनी पंतप्रधान मोदींची आज (9 डिसेंबर) भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.

उदयनराजे भोसले म्हणाले, ” 23 नोव्हेंबरला आम्ही मोदींजी ना, त्याचबरोबर राष्ट्रपतींना गृहमंत्री अमितजी पत्र पाठविले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अवमान झाला. त्यावर महाराष्ट्रात आता ठिकठिकाणी निदर्शन होत आहेत. त्यासंदर्भात आम्ही पत्र लिहिले होते. आम्ही जे पत्र राष्ट्रपतींना पाठविले. ते पत्र त्यांच्या सेक्रेटरी गृहमंत्र्यांना पाठविले आहे. यात जो प्रक्रियेचा भाग असतो, त्याचे पालन केले जाते. आज सुद्धा आम्ही प्रक्रियेप्रमाणे मोदींजींच्या कार्यालयात पत्र पाठविले आहे. आणि आमची तिच मागणी आहे की, कुठलाही एखादा विषय असतो. जास्त वाढ नये, जेणे करून त्या त्या तेढ निर्माण होई नये. ही त्या मागची भावना आहे. छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशाची अस्मिता आहे. आणि त्यांच्याबद्दल प्रत्येकांनी थोडेसे मोजून मापून खास करून जे काही विधान केले गेले. राज्यपाल हे पद मोठे आहे. देशातील सर्वात मोठे पद हे राष्ट्रपती असते. तसेच राज्यातील सर्वात मोठे पद हे राज्यपाल असते. त्यामुळे फार असंतोष पहायला मिळतोय, यावर लवकारत लवकर तोडगा निघणे गरजेचे आहे. यापूर्वी 23 नोव्हेंबरला पंतप्रधानांना पत्र पाठविले होते. आजही  पतप्रधानांना पत्र पाठविले आहे.”

या घटनेला राजकीय दृष्टीने बघने चुकीचे

महाविकास आघाडी येत्या 17 तारखेला महामोर्चा काढणार आहे, यासंदर्भात बोलताना उदयनराजे म्हणाले, “हा महाविकासआघाडी किंवा इतर पक्षांचा हा विषय नाही. याकडे कोणत्याही राजकीय दृष्टीने बघने एकदम चुकीचे आहे. पण, एक मात्र निश्चित आहे, जेवढे शिवभक्त किंवा महाराष्ट्र बाहेर जे लोक शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे लोक आहेत. निश्चित ते नाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजा  आण जे जे महापुरूष आहेत. त्यांच्याबाबतीत असेच घडत राहिले, तर ही काही चांगली लक्षणे नाहीत.

राज्यपालांनी माफी मागितली नाही ही तर खंत

राज्यपालांनी माफी मागायला पाहिजे होती, अद्याप राज्यपालांनी माफी मागितली नाही, असा पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर उदयनराजे म्हणाले, “ही तर खंत वाटते, अजून काय बोलणार. 17 तारखेला होणाऱ्या आंदोलनात शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केलेले आहे. तर महाविकास आघाडीच्या आंदोलनात तुम्ही सहभागी होणार का?, पत्रकारांच्या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, “मी माझ्यापरिने जे कारायचे होते.  ते मी केलेले आहे. किंबहुना मी त्यात कुठे मागेही पडलेलो नाही. आणि दुसरी गोष्टी म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल ज्यांना आस्था आहे. त्यात चुकीचे काहीच नाहीये, महाविकास आघाडी योग्यच आहे. मला वाटते की, सर्वांच हा मुद्दा उपस्थित करणे गरजेचे आहे.”

 

 

 

 

Related posts

राज्यातील हे ‘स्थगिती सरकार’ फार काळ टिकणार नाही !

News Desk

सांगलीचे खासदार संजय पाटील यांना मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा!

News Desk

#RamMandir : उद्धव ठाकरेंचा हा दौरा म्हणजे इव्हेंट !

News Desk