HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

कोस्टल रोडचे काम थांबवा, उच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश

मुंबई । कोस्टल रोडच्या कामासाठी समुद्रात भराव टाकण्यास मनाई करत ब्रीच कँडी येथील टाटा गार्डनमधील झाडे व गार्डनमधून रस्ता काढण्याचे काम त्वरित थांबवा, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (११ एप्रिल) झालेल्या सुनावणी दरम्यान पालिकेला दिले आहेत. त्याचप्रमाणे, २३ एप्रिलपर्यंत समुद्रात भराव टाकू नये, असेही आदेशही पालिकेला देण्यात आले आहेत. मुख्य न्यायाधीश व दोन न्यायाधीशांसमोर यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी याबाबतची सुनावणी झाली.

कोस्टल रोडच्या कामामुळे मच्छिमारांच्या उदरनिर्वाहावर परिणाम, टाटा गार्डनला छेद देत रस्ता काढण्यास ब्रीच कँन्डी येथील स्थानिक रहिवाशांचा विरोध, समुद्रातील जीवांना धोका पोहोचू शकतो, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात एकूण ५ याचिका दाखल केल्या होत्या. दाखल याचिकांपैकी २ याचिकांवर गुरुवारी सुनावणी करत न्यायालयाने २३ एप्रिलपर्यंत काम थांबवण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत.

समुद्रात भराव टाकल्याने मच्छिमारीचा व्यावसाय कारणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल. तसेच समुद्रात उभारण्यात येणाऱ्या २ पिलर्समधील अंतर २०० मीटर ठेवावे, अशी सूचना मच्छिमार संघटनांनी पालिकेला केली आहे. दोन पिलरमधील अंतर ५० मीटर ठेवल्याने बोटींना ये-जा करताना धोका निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता, असल्याचे सांगत मच्छिमार संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तर समुद्रात भराव टाकल्याने समुद्री जावाला धोका निर्माण होईल, या आशयाची याचिका आर्किटेक्ट श्वेता वाध यांनी उच्च न्यायालयात दाखल केली.

टाटा गार्डनमधील झाडांचा २०० झाडांचा बळी देत गार्डन जमीनदोस्त करत कोस्टल रोडसाठी रस्ता बनवण्याचे काम पालिका करणार आहे. टाटा गार्डन ३५ वर्षे जुने असून स्थानिक रहिवासी सकाळ-संध्याकाळ गार्डनमध्ये ये-जा करत असतात. तसेच टाटा गार्डन जमीनदोस्त झाल्यास पावसाळ्यात भुलाभाई देसाई रोड जलमय होईल, या आशयाची याचिका सोसायटी फाॅर इप्रुमेंट ग्रीनरी अँड नेचरच्या माध्यमातून केल्याचे डाॅ. निलेश बक्षी यांनी सांगितले. दरम्यान, पाच याचिकांपैकी गुरुवारी २ याचिकांवर सुनावणी करत २३ एप्रिलपर्यंत काम थांबवण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले आहेत.

Related posts

प्रचारसभांचा खर्च सादर करावा, निवडणूक आयोगाची मनसेला नोटीस

News Desk

शिवसेना आगामी निवडणुका स्वबळावर लढणार | संजय राउत

News Desk

‘घड्याळ’ असलेल्या अनेक हातांनी मला मदत केली | सुरेश धस

News Desk