HW News Marathi
राजकारण

अग्निशमन केंद्राच्या जागेवर सहकारमंत्र्यांचा बंगला

सोलापूर | अग्निशमन केंद्रासाठी सोलापूरमध्ये आरक्षित असलेल्या जागेवर महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बंगला बांधला आहे. या बंगल्याच्या बांधकामामुळे देशमुख चांगलेच अडचणीत येण्याची चिन्हे सध्या पहायला मिळत आहेत. बंगल्याचे बांधकाम बेकायदा असल्याचे म्हणत सोलापूर महापालिकेने बंगल्याचा परवाना मागे घेतल्याचा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला आहे. सदर प्रकरणावरुन सुभाष देशमुख यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची सर्व स्तरातून मागणी होत असल्याचे पहायला मिळत आहे.

या अलिशान बंगल्याची जागा अग्निशमन केंद्र व व्यापारी गाळ्यांसाठी होती. परंतु देशमुख यांनी या जागेवर बंगला बांधला आहे तसेच या बंगल्याच्या बांधकामास सोलापूर महापालिकेने परवानगी दिल्यामुळे महापालिकेवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने महापालिका आयुक्तांना त्यानुसार अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु अनेक दिवसात यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्यामुळे न्यायालयात पुन्हा एकदा अवमान याचिका दाखल करण्यात आली होती. त्या अनुशंगाने महापालिका आयुक्तांनी न्यायालयात आज अहवाल सादर करत बंगल्याच्या बांधकामाची परवानगी मागे घेतली असल्याचे म्हटले आहे. यावरुन हा बंगला बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट होत आहे.

सुभाष देशमुखांच्या या बेकायदेशीर बंगल्यामुळे विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी होत आहे. तसेच सोशल मिडीयावर देखील देशमुखांना मंत्री पदावर रहाण्याचा अधिकार नाही अशा टीका सर्वसामान्य नागरीकांकडून होताना पहायला मिळत आहेत. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून बंगला पाडण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कन्हैय्या कुमार उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

Gauri Tilekar

आदिवासींच्या हितासाठी ओडिसा सरकारने निवडणुकांची वाट पाहू नये !

News Desk

…तर मग टीका सोसवायची तयारी ठेवा, शिवसेना पुन्हा आक्रमक

News Desk
राजकारण

संविधानाचा अवमान करणाऱ्या संभाजी भिडेंना अटक करा | आठवले 

News Desk

पालघर | भारतीय संविधान लोकशाही राज्यव्यवस्थेत सर्वश्रेष्ठ आहे. संविधानापेक्षा कोणी मोठा नाही मात्र नंदुरबार येथे धर्मनिरपेक्षता मान्य नसल्याचे सांगत संविधानाचा अवमान करणारे वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंना अटक केली पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पालघर येथील काँग्रेस मैदान येथे झालेल्या जाहीर सभेत केली. पालघर जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती महोत्सवात रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी नवनिर्वाचित खासदार राजेंद्र गावित यांचा आणि केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचा रिपाइंच्या वतीने सत्कार करण्यात आला .यावेळी विचारमंचावर रिपाइंचे सुरेशदादा बारशिंग, रिपाइं पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव, ऍड. ईश्वर धुळे आदी मान्यवर उपस्थित होते. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान विश्वातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. संविधानामुळे भारतीय लोकशाही मजबूत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी अनेकदा सांगितले आहे की संविधान हा माझा सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ आहे. देशासाठी आणि सर्व धर्मांसाठी संविधान श्रेष्ठ आहे. ज्याला संविधान मान्य नाही त्याला देशात राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे संविधानाचा अवमान करणाऱ्या संभाजी भिडेवर गुन्हा दाखल करून अटक केली पाहिजे अशी मागणी रामदास आठवले यांनी यावेळी केली.

जात धर्म वंश पेक्षा देश मोठा ही शिकवण महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिली आहे. आंबेडकरी विचारांशी आम्ही एकनिष्ट असल्याचे रामदास आठवले यावेळी म्हणाले. पालघर मध्ये अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज रुग्णालय उभारण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रामदास आठवलेंनी यावेळी दिले. तसेच अजमेर शरीफ दर्ग्याला हिंदू मुस्लिम सर्व धर्मीय भाविक जात असतात. त्यामुळे अजमेर ला जाणाऱ्या ट्रेन ला पालघर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात येईल त्यासाठी आपण रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊ असे आश्वासन रामदास आठवलेंनी यावेळी दिले.

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रयत्नामुळे सहकार्यामुळे आपण खासदार म्हणून निवडून आल्याची कृतज्ञ भावना नवनिर्वाचित भाजप चे पालघर चे खासदार राजेंद्र गावित यांनी व्यक्त केली. रामदास आठवले यांनी आणि पालघरवासीयांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही तसेच खासदार म्हणून मिळणा-या ९ महिन्यांच्या अल्प काळात चांगली कामगिरी करून पालघरला सुसज्ज रुग्णालय आणि रेल्वे संबंधीचे प्रश्न सोडवू असे आश्वासन खासदार राजेंद्र गावित यांनी यावेळी दिले.

Related posts

LIVE UPDATES | महागाई विरोधात कॉंग्रेसची भारत बंदची हाक, बंदला २१ पक्षांचा पाठिंबा

News Desk

इंधन दर कपातीनंतर अरुण जेटलींचे विरोधकांना प्रत्युत्तर

Gauri Tilekar

राजेंनी राज्यसभेत मांडला मराठा आरक्षणाचा मुद्दा

News Desk