HW News Marathi
राजकारण

INX Media Case: पी. चिदंबरम यांची रवानगी तिहार तुरुंगामध्ये नाही

नवी दिल्ली | आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांच्या विनंतीची दखल घेऊन त्यावर निर्णय द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला दिले आहे. कनिष्ठ न्यायालायने जर चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळाला तरच त्यांना तिहार तुरुंगात पाठवू नये, त्याऐवजी त्यांनी घरी स्थानबद्ध करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने चिदंबरम यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर चिदंबरम यांना तिहार तुरुंगात पाठवले जाणार नाही, आणि जर ट्रायन न्यायालयात त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला तर तर त्यांची सीबीआय कोठडी५ सप्टेंबर पर्यंत वाढवली जावी. चिदंबरम यांची आज (२ सप्टेंबर) सीबीआय कोठडी संपणार आहे. सुनावणीच्या वेळी चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात सांगितले की, चिदंबरम ७४ वर्षांचे आहेत आणि त्यांना घरी स्थानबद्ध केले जाऊ शकते. यामुळे कोणाला काही समस्या नसायला हवी.

सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला आदेश दिला आहे की, चिदंबरम यांच्याकडून अजामीनपात्र वॉरंटविरुद्ध दाखल याचिकेवर आपण आपलं उत्तर द्या. चिदंबरम यांनी आपल्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट दाखल करणे आणि कोठडीत पाठवण्याच्या ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप सरकारच्या काळात महागाईवर नियंत्रण ठेवण्यात यश आले ! 

News Desk

दसरा मेळाव्याच्या याचिकेवर उद्या दुपारी मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी

Aprna

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या अपयशी होण्यामागे एक महिला | शत्रुघ्न सिन्हा

News Desk