HW News Marathi
राजकारण

दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन आणि दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका !

पुणे| महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित दादा पवारयांनी पुणे येथील दांडेकर पूल परिसरात मुठा कालव्याचे बांध कोसळून निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा गुरुवारी आढावा घेतला.कालव्याचे हजारो लीटर पाणी पर्वती भागातील झोपडपट्टीत घुसलं आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहात अनेकांचा संसार वाहून गेला.अकस्मात घडलेल्या या दुर्घटनेमुळे गोरगरिबांचे आर्थिकदृष्ट्या नुकसान झालेच; परंतु मानसिकरीत्या देखील ते खचले आहेत. यापुढेकसे होणार? असा प्रश्न पडलेल्या पूरग्रस्तांची अजित दादा यांनी भेट घेत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यासोबतचपुनर्वसनासाठी सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन दिले तसेच कामात हलगर्जी दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाचीकारवाई आणि दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

“मुठा कालवा हा सिमेंट काँक्रीटऐवजी मातीचा भराव टाकून बनलेला कालवा आहे. पाणी पुरवठा दररोज होणे अनिवार्य आहे, त्यामुळेकालव्यातून पाण्याचा विसर्ग नियमित बाब असून त्याच परिस्थितीत कालव्याच्या स्वच्छतेचं काम करण्यावाचून पर्याय नाही. मीपुणे जिल्ह्याचा पालकमंत्री असताना कालव्यातून गाळ उपसण्याची कामं वेळोवेळी करून घेतली,” असे अजितदादा पवार यांनीसांगितले. या कालव्याच्या मेंटेनन्ससाठी जलसंपदा विभागाने पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे २ कोटी रुपये निधीची मागणीकेली होती, परंतु त्याला प्रशासनाने फारसा प्रतिसाद दिला नाही, असं ऐकीवात असल्याचं अजित पवार म्हणाले. जलसंपदा विभाग,महानगरपालिका दोघे मिळून कालव्याच्या देखरेखीचे काम पाहत होते. पण त्यांनी आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने पुणेकरांनापुरस्थितीचा नाहक त्रास सहन करावा लागला. पर्वती भागातील दांडेकर पुलाजवळील बैठी घरांत कालव्याचं पाणी घुसून गोरगरिबांचंमोठं नुकसान झाले आहे . या घटनेसाठी जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली पाहिजे. दोषी कंत्राटदारांनाकाळ्या यादीत टाकले पाहिजे, जेणेकरून त्यांना पुन्हा कामाचे कंत्राट मिळणार नाही, अशी मागणी अजित दादांनी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्यावतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केली आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते कार्यकारिणी बैठका आणि अन्य कामांत गुंतले आहेत. जनतेच्या समस्यांशी त्यांनादेणेघेणे नाही, हे या दुर्घटनेतून स्पष्ट होते, अशा शब्दांत अजित दादा यांनी सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या कामाबाबत संताप व्यक्तकेला. याशिवाय गलथान कारभारामुळे एवढे पाणी वाया गेले, याला जबाबदार कोण? असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलाआहे. नुकसानभरपाई जलसंपदा विभाग किंवा महानगरपालिकेने भरून द्यावी; दोन्ही भाजपाच्या अखत्यारित येतात. राज्यकर्ते पदकिंवा महापौर पद सांभाळताना घटनेची नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे, असे ही ते म्हणाले. त्याचप्रमाणे कुठलेही कामकरून घेण्यासाठी धमक असली पाहिजे, अशी टीका त्यांनी विरोधी पक्षावर केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विदर्भाच्या विकासाचा हा झपाटा पाहता स्वतंत्र विदर्भ मागण्याची गरजच राहिली नाही !

News Desk

“…मिंधे सरकारमध्ये एवढी धमक उरली आहे काय?”, सामनातून हल्लाबोल

Aprna

मोबाईल घोटाळ्यानंतर आता ३२५ कोटींचा फर्निचर घोटाळा

News Desk