HW Marathi
राजकारण

पणजोबांचा आदर्श घ्या, पाकिस्तानी मंत्र्यांचा राहुल गांधीला टोला

नवी दिल्ली |   “तुमचे गोंधळलेले राजकारण ही सर्वात मोठी समस्या आहेत. तुम्ही ठापणे सत्याची बाजून घेणे गरजेचे आहे. तुम्ही जरा तुमच्या पणजोबांचा आदर्श घ्या,” असा टोला पाकिस्तानचे सूचना आणि प्रसारण मंत्री फवाद हुसैन यांनी ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लगावला.  जम्मू-काश्मीरमधील ३७० रद्द केल्यानंतर राहुल गांधी सरकारच्या या निर्णयाविरोधात ट्वीट केले होती. सरकार विरोधीत केलेल्या ट्वीटचा वापर पाकिस्ताने काश्मीरचा मुदा संयुक्त राष्ट्र संघाला लिहिलेल्या पत्रात केला. यात राहुल गांधींनी काश्मीरमधील ३७० रद्दे केल्यानंतर केलेल्या ट्वीट हवाला देण्यात आला होता. हीबाब राहुल गांधींच्या लक्ष्यात येताच त्यांनी आज (२८ ऑगस्ट) ट्वीट करत पाकिस्तानला खडेबोल सुनावले.

राहुल गांधी ट्वीट करत म्हणाले की, “‘माझे भाजप सरकारसोबत अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत. मात्र जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, हे मी स्पष्ट करतो. यामध्ये पाकिस्तान किंवा इतर देशांनी हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही अशा शब्दात पाकिस्तानसह चीन आणि अमेरिकेलाही इशारा देईल आहे.”

राहुल गांधी यांनी दुसऱ्या ट्वीट म्हटले की, “जम्मू-काश्मीरमध्ये हिंसा झाली आहे. कारण जम्मू काश्मीरमधील नागरिकांना भडकवले जात असून पाकिस्तानचा या सर्वाला पाठिंबा मिळत आहे. या पाकिस्तानची जगभरात दहशतवादाचा मुख्य समर्थक अशी ओळख आहे.” राहुल गांधींच्या ट्वीटला पाकिस्तानचे सूचना आणि प्रसारण मंत्री फवाद हुसैन यांनी ट्वीट करत म्हटले की, तुमचे गोंधळलेले राजकारण ही सर्वात मोठी समस्या आहेत. तुम्ही ठापणे सत्याची बाजून घेणे गरजेचे आहे. तुम्ही जरा तुमच्या पणजोबांचा आदर्श घ्या, जे भारतीय धर्मनिरपेक्षा आणि उदारमतवादी विचारसरणीचे प्रतीक होते.” अशी टीका करत राहुल गांधींनी रीट्वीट केले.  राहुल गांधींना फवाद यांच्या ट्वीटला अद्याप कोणताही रिप्लाय दिला नाही.

Related posts

पंतप्रधान मोदी शिवलिंगावर बसलेल्या विंचवासारखे !

Gauri Tilekar

महाराष्ट्रातील  निवडणुकांमध्ये मतपत्रिकेचा वापर झाल्यास ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ – महेश तपासे

News Desk

#CoronaVirus | पंतप्रधानांनी घोषित केलेला ‘जनता कर्फ्यू’ म्हणजे नक्की काय ?

News Desk