HW News Marathi
राजकारण

तुम्ही ‘त्यांनी’ दिलेले पैसे घ्या, मात्र मत ‘आप’लाच द्या !

नवी दिल्ली | “देशातील अन्य राजकीय पक्षांकडून तुम्हाला पैसे दिले जातील. तुम्ही त्यांनी दिलेले पैसे घ्या पण तुमचे मत ‘आप’लाच द्या”, असे अजब आवाहन आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. केजरीवाल हे दक्षिण दिल्लीतील ‘आप’चे उमेदवार राघव चड्डा यांच्या प्रचारादरम्यान सोमवारी (६ मे) बोलत होते. “पंतप्रधान मोदींनी राफेल घोटाळ्यातून अमाप पैसा कमावला आहे. त्याच पैशाने आता मोदी आमदार विकत घेत आहेत”, असा गंभीर आरोप केजरीवाल यांनी केला होता.

“अनेक राजकीय पक्षांकडून मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत अनेक प्रलोभने दिली जातात. तुम्हाला देखील कोणी अशी प्रलोभने देत असतील तर ती घ्या. त्यांना नकार देऊ नका. परंतु, तुमचे मत मात्र ‘आप’लाच द्या”, असे आवाहन केजरीवाल यांनी प्रचारसभेदरम्यान उपस्थित लोकांना केले आहे. “नोटाबंदी हा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा आहे. यंदाही जर व्यापाऱ्यांनी भाजपला मत दिले तर हे सीलिंग सुरूच राहील. मात्र, जर तुम्ही ‘आप’ला मत दिले तर हे सीलिंग बंद होऊ शकते”, असे केजरीवाल यांनी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळणार

News Desk

कॉंग्रेसकडून पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुक विश्वजीत कदम लढणार

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदींची वर्ध्यात पहिली प्रचार सभा

News Desk