भंडारा-गोंदिया | जगातील अनेक देशांमध्ये निवडणूक आयोगाने इव्हीएमचा वापर सुरु केला होता. परंतु कालांतराने इव्हीएममधील त्रुटी समोर आल्या आणि त्यांनी पुन्हा मतपत्रिकांचा वापर सुरु केला. तसेच भंडारा गोंदियात ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा आरोप प्रफुल्ल पटेल यांनी केला असून भंडारा-गोंदियात फेरनिवडणूक घ्या अशी मागणी केली आहे.
There are complaints of large-scale EVM malfunctioning in Bhandara-Gondia by-elections. Polling was suspended at 35 booths. We demand re-elections and also scrapping of EVMs and voting should happen by ballot.#Bypolls #LokSabha @NCPspeaks @MumbaiNCP pic.twitter.com/Ynzhc23gq8
— Praful Patel (@praful_patel) May 28, 2018
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत सोमवारी सकाळपासून ६ विधानसभा क्षेत्रातील ६४ मतदान केंद्रांवर मतदान थांबले होते. त्यातील तब्बल ३४ ठिकाणी मतदान रद्द करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादीला सांगण्यात आले आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार भंडारा-गोंदियामधील जास्त उन्हामुळे इव्हीएमचे सेन्सर्स बंद पडले होते. परंतु इतर मशीनच्या बाबतीतसुद्धा तेच घडलं तर तर परिस्थिती अजूनच बिघडेल असे प्रफुल्ल पटेल म्हणालेत. सर्वच व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची मोजणी व्हावी, अशी मागणी सुद्धा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.
भंडारा-गोंदिया येथे अनेक ठिकाणी ईव्हीएमबाबत तक्रारी आल्या असून ३४ मतदानकेंद्रांवरील मतदान रद्द करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी फेरमतदान घ्यावे लागणार आहे. फेरमतदान होईपर्यंत मतमोजणी करू नये आणि ईव्हीएमऐवजी पुन्हा मतपत्रिका वापरण्यात याव्यात,अशी आमची मागणी आहे. @NCPspeaks @MumbaiNCP pic.twitter.com/IL4PC0hdsj
— Praful Patel (@praful_patel) May 28, 2018
सध्याची मतदान प्रक्रिया ज्या पद्धतीने सुरु आहे ती रद्द करण्यात यावी. या इव्हीएमवर आम्हाला भरवसा नाही. कारण, या इव्हीएम मशिन्स सुरतवरून आणल्याने त्या व्यवस्थित आहेत की नाही याबाबत आम्हाला शंका आहे, असेही पटेल यावेळी म्हणालेत.त्याच बरोबर प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन ट्विट करत भंडारा-गोंदिया येथे अनेक ठिकाणी ईव्हीएमबाबत तक्रारी आल्या असून ३४ मतदानकेंद्रांवरील मतदान रद्द करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी फेरमतदान घ्यावे लागणार आहे. फेरमतदान होईपर्यंत मतमोजणी करू नये आणि ईव्हीएमऐवजी पुन्हा मतपत्रिका वापरण्यात याव्यात,अशी आमची मागणी आहे अशा आशयाचे ट्विट केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.