HW News Marathi
राजकारण

राहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड, दिवसभरातील सर्व सभा उशिराने

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची शुक्रवारी (२६ एप्रिल) संगमनेरमध्ये प्रचारसभा होणार आहे. मात्र, राहुल गांधी प्रचारसभेसाठी पाटना येथे जात असताना त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांना पुन्हा दिल्लीला परतावे लागले आहे. राहुल यांनी स्वतः ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, त्यामुळे आज दिवसभरात होणाऱ्या राहुल गांधी यांच्या सभांना उशीर होणार असल्याची माहिती मिळत आहे. राहुल गांधी यांच्या आज संगमनेरसह बिहारमधील समस्तीपूर आणि ओडिशातील बालासोरमधील सभा होणार आहेत.

राहुल गांधी यांनी स्वतः याबाबतचे ट्विट करून विमानाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. “आज प्रचारसभेसाठी पाटणा येथे जाताना आमच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने आम्हाला दिल्लीला परतावे लागले आहे. दरम्यान, यामुळे माझ्या बिहारमधील समस्तीपूर, ओडिसामधील बालासोर आणि महाराष्ट्रामधील संगमनेर येथील सभांना विलंब होण्याची शक्यता आहे”, अशा आशयाचे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. सभांना होणाऱ्या विलंबाबाबत राहुल गांधी यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘नमो अ‍ॅप’च्या माध्यमातून पंतप्रधान मोदी जाणून घेणार लोकांचा कौल

News Desk

मतदान केल्यानंतर कुंभमेळ्यात स्नान केल्याचे भाग्य लाभते | पंतप्रधान मोदी

News Desk

पुलवामा हल्ला हा निवडणुकांसाठी मोदींनी केलेला पूर्वनियोजित कट !

News Desk