HW News Marathi
राजकारण

‘ठाकरे’ सिनेमाचे दिग्दर्शक-निर्माते यांच्यात आता ट्विटर वॉर

मुंबई | दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमाचा काल (२३ जानेवारी) प्रीमियर शो प्रदर्शित झाला. या प्रीमियर दरम्यान मानापमान नाट्याचा वाद चांगलच पेटला दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणावर मनसेने ठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक आणि मनसे नेते अभिजित पानसे यांच्या समर्थनार्थ मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी #Isupportabhijitpanse ही मोहीम सुरु केली आहे. देशपांडे यांनी यासंदर्भातील ट्विट केले आहे.

पुढे त्यांनी म्हटले की, “मा.बाळासाहेब हे सामान्य शिवसैनिका ला सुद्धा प्रेमाने वागवायचे त्याचा अपमान नाही करायचे हाच ठाकरे चित्रपटाचा संदेश आहे जो या चित्रपटाची निर्मिती करण्याऱ्या ना सुद्धा कळला नाही#ISupportAbhjitPanse” ट्विट केले आहे.

तसेच ठाकरे सिनेमाचे निर्माते संजय राऊत यांनी ट्विट करत देशपांडेना सडेतोड उत्तर दिले आहे. “ठाकरे The Biopic… लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणी कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते. ठाकरे चित्रपटाचा हाच संदेश आहे.” अशा शब्दात राऊत यांनी टीका केली आहे.

https://twitter.com/rautsanjay61/status/1088318562706571264

नेमके काय आहे प्रकरण

बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ‘ठाकरे’ चित्रपटाचा प्रीमियर शो काल (२३ जानेवारी) आयोजित केला होता. या सिनेमाच्या प्रीमियरला शिवसेना नेते व सिनेसृष्टीतील कलाकार उपस्थित होते. या सिनेमाचे दिग्दर्शक आणि मनसे नेते अभिजित पानसे हे देखील उपस्थित होते. त्यावेळी दिग्दर्शक येण्याआधीच शो सुरू केल्याने पानसे यांनी राऊत यांच्यावर नाराजी व्यक्त करत सिनेमागृहातून पाय काढला.

परंतु याबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, “मी सुद्धा सिनेमाला उशीरा पोहोचलो आणि अभिजित पानसे यांना सुद्धा उशीर झाला. त्यांना काम असल्याने ते निघून गेले असे, म्हणत संजय राऊत यांनी या विषयावर बोलण्याच टाळले. मात्र, ठाकरे सिनेमाच्या प्रमोशनमध्ये अभिजीत पानसे यांना डावल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकारणातही नौटंकी होत असते !

News Desk

राहुल गांधी नांदेडमधून निवडणूक लढणार ?

News Desk

सप-बसपच्या आघाडीने मोदींची झोप उडाली

News Desk