मुंबई | देशात सध्या मॉब लिंचिंगच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर देशातली ४९ प्रतिभावंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र लिहिले होते. यानंतर ६१ प्रतिभावंतांनी मोदींनी पत्र लिहिणाऱ्या ४९ जणांवर उद्देशून पत्र लिहून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. याआधी ४९ प्रतिभावंतांनी मॉब लिंचिंग आणि दलित, मुस्लिमांवरील हल्ल्याच्या घटनांचा निषेध करत सरकारवर टीका केली होती. या नव्या पत्रावर प्रसून जोशी, बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत, मधुर भंडारकर, विवेक अग्निहोत्री, शास्त्रीय नृत्यांगना, राज्यसभा सदस्य सोनल मानसिंह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
61 personalities including actor Kangana Ranaut, lyricist Prasoon Joshi, Classical Dancer and MP Sonal Mansingh,Instrumentalist Pandit Vishwa Mohan Bhatt, Filmmakers Madhur Bhandarkar& Vivek Agnihotri write an open letter against ‘selective outrage and false narratives’. pic.twitter.com/RGYIxXeJzS
— ANI (@ANI) July 26, 2019
या पत्रातून ४९ प्रतिभावंताना उलट प्रश्न विचारणात आली आहे की, “जेव्हा नक्षलवादी आदिवासींना लक्ष्य करतात तेव्हा हे लोक शांत का राहतात?, जेव्हा काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांनी शाळा बंद केल्या तेव्हा हे लोक कुठे गेले होते ?, जेएनयूमध्ये करण्यात आलेल्या घोषणाबाजीवरुनही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. जेव्हा देशाचे तुकडे होतील अशी घोषणा देण्यात आली तेव्हा तुम्ही तुमचे म्हणणे का नाही मांडले?, या टिकेनंतर आता ६१ जणांनी पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्यांचा निशाणा साधला आहे. या पत्रात सरकारचे त्यांनी समर्थन केले आहे.
जाणून घ्या ४९ प्रतिभावंतांनी पत्रात नेमके काय म्हणाले
याआधी ४९ प्रतिभावंतांनी नरेंद्र मोदींना पत्र लिहित देशातील अल्पसंख्यांक आणि दलितांविरोधात ‘मॉब लिचिंग’च्या घटना वाढत असल्याचा आरोप केला होता. मुस्लीम, दलित व इतर अल्पसंख्याकांच्या झुंडबळीच्या घटना तात्काळ थांबवा, असे आवाहन केले होते. ‘मतभेदांशिवाय लोकशाही असू शकत नाही’, असेही त्यांनी म्हटले होते. ‘जय श्रीराम’ ही घोषणा आता केवळ एखाद्याला चेतावण्यासाठी वापरले जाणारा आरोप चित्रपट निर्माते श्याम बेनेगल, अपर्णा सेन, शास्त्रीय गायिका शुभा मुदगल आणि इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा यांच्यासह ४९ जणांनी लिहिलेल्या पत्रात केला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.