नवी दिल्ली | देशभरातील सतराव्या लोकसभा निवडणुकीचे आज (१० मार्च) बिगूल वाजणार आहे. निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत आजपासून देशभरात आचारसंहिता लागू झाल्याची माहिती मुख्य निवडणूक आयोग आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले आहे. दिल्लीच्या विज्ञान भवनामध्ये निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू आहे. देशभरात ७ टप्पयात लोकसभा निवडणूका होणार आहेत. तर २३ ‘मे’ला लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. महाराष्ट्रात ४ टप्प्यात लोकसभा निडवणुका होणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार नसल्याचे निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त अरोरा यांनी सांगितले.
#LokSabhaElection2019: 1st phase polling to be held on 11th April, 2nd phase on 18th April, 3rd phase on 23rd April, 4th phase polling to be held on 29th April, 5th phase polling on 6th May, 6th phase polling on 12th May, 7th phase 12th May. Counting of all phases on 23rd May. pic.twitter.com/1IcW8KGg91
— ANI (@ANI) March 10, 2019
महाराष्ट्रात या ४ टप्प्यात होणार लोकसभा निवडणुका
महाराष्ट्रात ४ टप्प्यात लोकसभा निडवणुका होणार आहेत. महाराष्ट्रात ११ एप्रिल ७ जाग, १८ एप्रिल १० जाग तर २३ एप्रिल १४ जाग, २९ एप्रिल १७ जागांसाठी लोकसभा निवडणुका होणार असल्याचे निवडणूक आयोगाने आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
देशभरात ७ टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार
यंदा देशभरात लोकसभा निवडणुका या ७ टप्प्यात पार पडणार आहे. ११ एप्रिल पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर १८ एप्रिल दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. २३ एप्रिल तिसऱ्या टप्प्यातील मतदान, २९ चौथ्या टप्प्यातील मतदान, ६ मे पाचव्या मतदान, १२ मे सहाव्या टप्प्याचे मतदान आणि १९ मेला सातव्या शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार आहे.
पत्रकार परिषदेतील महत्त्वाची मुद्दे
- देशातील मतदारांची संखा ९० कोटी
Sunil Arora, Chief Election Commissioner: Total electorate in this Lok Sabha elections will be 900 million, of which 15 million voters are in the 18-19 age group. pic.twitter.com/LyqvJtu3gQ
— ANI (@ANI) March 10, 2019
- २०१४च्या तुलनेत ७ कोटी मतदार वाढले
Sunil Arora, Chief Election Commissioner: There will be approximately 10 lakh polling stations in this Lok Sabha Elections as compared to 9 lakh polling stations in 2014. pic.twitter.com/qvkX5WVHNv
— ANI (@ANI) March 10, 2019
- १९ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या दीड कोटी
- दीड कोटी नोकरदार मतदारांची संख्या
- यंदा ९० कोटी लोक मतदान करणार
- ईव्हीएमवर उमेदवाराचा फोटो असणार
- मतदान केंद्र व्हीव्हीपॅड सुविधा उपलब्ध होणार
- राजकीय पक्षांशी चर्चा झाली आहे
- देशभरात आजपासून आचारसंहिता लागू झाली
- ९९.३ मतदारांकडे मतदान ओळख पत्र
- देशात १० लाख मतदान केंद्र असणार
- ७ टप्प्यात लोकसभा निवडणूका होणार
#LokSabhaElections2019 to be held in 7 phases. pic.twitter.com/k1B5upGIP9
— ANI (@ANI) March 10, 2019
- २३ ‘मे’ला लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार
- ११ एप्रिला पहिल्या टप्प्यातील मतदान
- १८ एप्रिला दुसऱ्या टप्प्यातील मतदान
- २३ एप्रिला तिसऱ्या टप्प्यातील मतदान
- २९ चौथ्या टप्प्यातील मतदान
- ६ मे पाचव्या मतदान
- १२ मे सहाव्या टप्प्याचे मतदान
- १९ मेला सातव्या शेवटच्या टप्प्याचे मतदान
- महाराष्ट्रात ४ टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत.
- ११ एप्रिल ७ जागांसाठी मतदान होणार
- १८ एप्रिल १० जागांसाठी मतदान होणार
- २३ एप्रिल १४ जागांसाठी मतदान होणार
- २९ एप्रिल १७ जागांसाठी लोकसभा निवडणुका होणार
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.