HW Marathi
राजकारण

काँग्रेसची मोठी घोषणा, १२ हजारपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गरीब कुटुंबांना ७२ हजार रुपये

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची लोकसभा निवडणुकीच्या पर्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. ज्यांचे मासिक उत्पन्न १२ हजारपेक्षा कमी असलेल्या कुटुंबाना वर्षा अखेरीस ७२ हजार रुपये मिळाणार असल्याची घोषणा राहुल यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील श्रीमंताना मदत करतात, परंतु आम्ही देशातील गरीबांना मदत करणार, असे सांगत मोदींवर टीका केली

राहुल पुढे असे देखील म्हणाले की, या योजनेचा लाभ देशातील २० टक्के गरीब जनतेला मिळणार असल्याचे राहुल यांनी म्हणाले आहे. या योजनेचा लाभ देशातील ५ कोटी कुटुंब आणि २५ कोटी जनतेला थेट फायदा मिळाणार असल्याचे सांगितले आहे.

राहुल गांधीच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

  • आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटनांना न्याय देणार
  • २० टक्के गरीब जनतेला वर्षाला ७२ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करणार
  • ५ कोटी कुटुंब आणि २५ कोटी जनतेला याचा थेट फायदा मिळाणार
  • ज्यांचे मासिक उत्पन्न १२ हजारपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाना यांचा फायदा मिळणार आहे

 

 

Related posts

#LokSabhaElections2019 : काँग्रेस आज महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार

News Desk

अमृतसरमधील रावण दहन आयोजकांवर मनुष्यवधासह इतर गुन्हे दाखल करा !

News Desk

आघाडीत एमआयएम, मनसेला स्थान नाही!

News Desk