HW News Marathi
राजकारण

ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्याचा निर्णयाकडे सर्वांचे लक्ष; ठाकरे गटाकडून अन्य पर्यायचा शोध सुरू

मुंबई | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri East Assembly By-Election)  दिवंगत आमदार रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, मुंबई महापालिकेने ऋतुजा लटकेंचा राजीनामा अद्याप मंजूर केला नाही. या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) ठाकरे गटाने धाव घेतली असून यावर आज (13 ऑक्टोबर) न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आता न्यायालय लटकेंच्या याचिकेवर काय उत्तर देणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. यात आता ऋतुजा लटकेंचा राजीनामा न्यायालयाने मंजूर केला नाही. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाने प्लॅन बी तयार केला आहे. ठाकरे गटाने रमेश लटकेंच्या मातोश्री, रमेश लटकेचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी नगरसेवक संदीप नाईक आणि अंधेरी पूर्व संघटक प्रमोद सावंत यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच प्रमोद सावंत हे ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे विश्वासू मानले जात आहे. यामुळे आता अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत नेमकी कोणाला उमदेवारी मिळणार हे पाहावे लागेल.

निवडणूक आयोगाने चिन्ह वाटप केल्यानंतर माध्यमाशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “भाजप-बाळासाहेबांची शिवसेना यांची युतीत अंधेरी पूर्व पोटनिवडणूक लढवणार आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु, भाजपचा उमेदवार मुरजी पटेल हे निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

Related posts

‘मविआ’ सरकार टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार! – अजित पवार

Aprna

लोकांनी विरोधात बसण्याची संधी दिली, सक्षम विरोधकांची भूमिका पार पाडू !

News Desk

राजनाथ सिंग यांनी केला केजरीवाल यांना फोन

News Desk