HW News Marathi
राजकारण

काँग्रेसने जाहीरनाम्यासाठी जनतेकडून मागविल्या सुचना

पुणे | लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीसाठी काँग्रेस जाहीरनाम्याच्या तयारीला लागली आहे. परंतु काँग्रेसने जाहीरनामा तयार करण्यासाठी जनतेकडून सुचना मागवल्या आहेत. या सुचनानुसार काँग्रेसचा जाहीरनामा तयार करण्यात येणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जनतेच्या सुचनांसाठी आग्रही आहेत.

यासाठी काँग्रेसने प्रत्येक राज्यातील समितीने www.fifesto2019@coZ हे संकेतस्थळ जाहीर करण्यात आले. या संकेस्थळावर सुचना मागवाव्यात येणार असल्याची माहिती सूंत्राकडून मिळाली आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय असावे यासंबधी नागरिकांनी या संकेतस्थळावर आपल्या सुचना द्याव्यात असे आवाहन करण्यात आले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पक्षाच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष असून यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बुधवारी (३० जानेवारी) बैठक झाली आहे. या बैठकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या तीन सदस्यांबरोबरच पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, आमदार अनंत गाडगीळ व समितीचे अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते. त्यात लोकसभेबरोबरच विधानसभेसाठीही जाहीरनामा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या कुंचल्याद्वारे पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना फटकारलंय.

News Desk

शिंदे गटाला घटनापीठाचा मोठा दिलासा! पक्षचिन्हाबद्दलचा निर्णय निवडणूक आयोग घेणार

Aprna

राष्ट्रपती निवडणूक २०२२; निवडणूक मतपेटी दिल्लीकडे रवाना

Aprna