HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्र्यांसह 16 आमदारांच्या अपात्रेवर सुनावणी सुरू

मुंबई। राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या भवितव्य आज ठरणार आहे. शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रेवर आज (११ जुलै) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.  शिंदेंसह १६ आमदारांनी शिवसेनेसोबत बंड पुकारत भाजपशी हात मिळवणी केल्यानंतर शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे तक्रार केली. यानंतर झिरवळ यांनी १६ आमदारांना अपात्र ठरविण्याची नोटीस बजावली. या नोटीस वरोधात शिंदे गटाने न्यायालयात धाव घेतली. यामुळे
न्यायालयाच्या या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शिंदेंनी नोटीवर न्यायालयात २७ जून रोजी सुनावणी पार पडली. तेव्हा न्यायालयाने पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होण्याची तयारी निश्चित केली. या सुनावणीत बंडखोर आमदारांनी महविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे सुनावणीदरम्यान सांगितले होते. यावेळी न्यायालयाने शिंदे गटाला विचारले की, मुंबई उच्च न्यायालयात जाण्याऐवजी सर्वोच्च न्यायालयात काय आला?, यावर शिंदे गटाच्या वकिलांनी म्हटले, “आमच्या घरावर हल्ले करत होत आहेत. मुंबईत परत आल्यावर आमपचे मृतदेह परत येतील,”अशी धमकी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे माध्यमांतून देत आहे. त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती त्यांनी दिले.
शिंदेंनी शिवसेनेसोबत बंड पुकारले, त्यांच्यासह ३९ आमदारांनी देखील पक्षासोबत बंड पुकारला. यानंतर सर्व आमदार सुरतला गेले येथून गुवाहाटीला आठवडाभर मुक्कामी होते. यानंतर शिंदे सरकारने भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन केले. या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने ५ जुलै रोजी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात १६४ मतांनी विजयी मिळवत बहुमत चाचणीच्या परीक्षेत पास झाले.
ही आहेत आमदारांची 16 नावे

एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, लता सोनावणे, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, महेश शिंदे , चिमणआबा पाटील, संजय रायमूलकर, बालाजी कल्याणकर, रमेश बोरणारे.

संबंधित बातम्या
शिंदे गटाला मोठा दिलासा! अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार तुर्तास टळली
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना ‘पीडीपी’च्या मंचावर जाताच सगळे आभाळ कोसळल्यासारखे बोंबलू लागले !

News Desk

भारतीय जवानांच्या फोटोचा कोणत्याही राजकीय पक्षांनी वापर करून नये | निवडणूक आयोग

News Desk

जे हात सत्तेच्या तख्तावर बसवतात तेच उद्या हे तख्त फोडूदेखील शकतात !

News Desk