HW News Marathi
Covid-19

देशात ५ ओमिक्रॉनचे रुग्ण; ‘या’ राज्यांची वाढली चिंता

मुंबई | कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्रानंतर आता दिल्लीत ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला आहे. दिल्लीतील रुग्ण ३७ वर्षाचा असून सध्या त्यांच्यावर लोकनायक जयप्रकाश नारायण (एलएनजेपी) रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंदर जैन यांनी सांगितले आहे. दरम्यान या रुग्णांनी नुकतेच टांझानियावरून आला होता. आता देशात एकूण ५ ओमिक्रॉनचे नवे रुग्ण सापडले आहेत. यात कर्नाटकात २, गुजरात १, महाराष्ट्र १ आणि दिल्लीत १ असे एकूण ५ ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले आहे.

राज्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण कल्याण-डोंबिवलीत सापडला आहे. मुंबई जवळच्या कल्याण-डोंबिवलीत एका व्यक्तीला ओमिक्रॉनची रुग्ण झाली. हा ओमिक्रॉनचा दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबई दाखल झाला. ओमिक्रॉन रुग्णांचे ३३ वर्षीय तरुण आहे. आता दिल्लीत देखील ओमिक्रॉनचा एक रुग्ण सापडला आहे.

दरम्यान देशातील कर्नाटकमध्ये दोन व्यक्तींना ओमिक्रॉनली लागण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्र्यालायने दिली. यानंतर गुजरामध्ये एका वृद्ध व्यक्तीला काल (४ डिसेंबर) ओमिक्रॉनची लागण झाल्याची माहिती मिळाली. आणि आता राज्यातील कल्याण-डोंबिवलीमधील एका तरुणाला ओमिक्रॉनची लागण झाली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पडळकरांची टीका अन् फडणवीसांच्या ‘त्या’ दाव्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

News Desk

अदार पुनावाला हे पुण्याचे, महाराष्ट्राला झुकतं माप द्यावे !

News Desk

#Coronavirus : राज्याचा आकडा २३४०१, आज ५८७ कोरोनामुक झाले

News Desk