HW News Marathi
राजकारण

सरकारला शेतकऱ्यांचे सोयरसुतकच नाही

राज्य सरकारमध्ये सर्व काही अलेबल सुरू असल्याचे वरकरणी दिसत असले तरी सर्वसामन्य जनतेला आजही हे सरकार आपले वाटत नाही किंबहूना सरकारविषयी आपुलकी वाटत नाही. राज्य सरकार शेतकरी, सर्वसामान्यांचे कैवारी असल्याचे सांगत आहे. हे सांगण्यासाठी जाहिरातींचा भडीमार केला जात आहे. परंतु प्रत्यक्षात शेतकरी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर पोहोचून जीवनयात्रा संपवण्यापर्यंत मजल मारतो तरी या सरकारला जाग येत नाही.

आजही सरकारला शेतकऱ्यांच्या खऱ्या समस्या समजलेल्या दिसत नाहीत. धर्मा पाटील यांच्या मृत्यूने तर सरकारच्या कारभाराचे वाभाडे राज्यसमोर आले आहेत. धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर शेतकऱ्यांच्या समस्यावर सरकार गंभीर वागेल असे दिसत असले तरी प्रत्यक्षात वेगळेच चित्र आहे. मंत्रालयाबाहेर अनेकजण आजही धर्मा पाटील यांच्या रुपात फिरत आहेत. पाटील यांनी विष प्राशन केल्याने त्यांची समस्या जगासमोर आली एवढेच..

गेल्या महिन्यातील एक उदाहरण. जळगाव जिल्ह्यातील एक शेतकरी बोंड अळीमुळे झालेले नुकसान मिळावे, यासाठी कृषी मंत्र्याच्या दालनात खेटा मारत होता. मंत्री महोदयाने स्वाक्षरी केल्यानंतरही संबंधित शेतकऱ्यास मोबदला मिळालाच नाही. निगरगट्ट अधिकाऱ्यांनी चिरीमिरीसाठी त्या शेतकऱ्याची अद्याप फाइल मंजूर केलेली नाही. धर्मा पाटील यांच्या आत्महत्येमुळे हे उदाहरण डोळ्यासमोर आले. हे दोन्ही शेतकरी खान्देशातील आहेत. त्यांच्या समस्या शेतीविषयक आहे. आणि हे सरकार सर्वसामन्यांचे असल्याचे सांगत आहे. हा सर्व विरोधाभास राज्याला अधोगतीकडे घेऊन जाण्यासाठी पुरेसा ठरू शकतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विनोद तावडेंना तिकीट मिळू नये हा नियतीचा अजब खेळ !

Gauri Tilekar

इंद्रनील राजगुरू यांनी ‘आप’ला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये केली घरवापसी

Darrell Miranda

मोदींचा शपथविधी सोहळा देशाला मजबुतीकडे नेणारा ठरेल ही ईश्वरी योजनाच !

News Desk