HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी; गुप्तचर विभागाची माहिती

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती गुप्तचर विभागाला (Intellenge Bureau)  मिळाली आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ आणि ठाण्यातील घराबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना नकक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकीची दिल्याची माहिती मिळाल्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

दरम्यान, महिन्याभरापूर्वीच मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याचे पत्र आले होते. यानंतर निनावी धमकीचा एक फोन सुद्धा आला होता. यापूर्वीच नकक्षलवाद्यांचे जीवे मारण्याची धमकी आली होती. मुख्यमंत्री पंढरपुरातील आषाढी वारीच्या वेळीही जीवाला धोका असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान मुख्यमंत्र्यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी दिली होती.

मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारने पीएफआयवर बंदी घातल्याने धमकी मिळाली होती. आणि आता त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. तसेच शिंदे गटाचा बीकेसीवर दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्यावरून राज्याचे राजकारण तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ केली असून दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर मोजकेच लोक असल्याची माहिती माध्यमातून मिळत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Aurngabad : मृत मजूरांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत – शिवराज सिंह

News Desk

लोकप्रतिनिधींना अशा धमक्या येईपर्यंत गुन्हेगार निर्ढावले ? सुप्रिया सुळेंचा सवाल

Aprna

माझे बोट धरुन राजकारणात आलेला माणूस इतका बदलू शकतो ?

News Desk