HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या प्रश्नावर मंत्र्यांचे उत्तर असमाधानकारक; विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केला सभात्याग

मुंबई | विधीमंडळ सभागृहातील शंभर आमदार अंगणवाडी सेविका (Anganwadi Sevika) व मदतनीसांना मानधन वाढवून देण्याबाबत प्रश्न विचारत आहेत. इतका गंभीर प्रश्न असताना संबंधित बालविकासमंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगणार आहेत असे बोलत असतील तर या मंत्र्यांना इथे उत्तर देण्याचा काय अधिकार आहे असा थेट सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला.

अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधन वाढीचा प्रश्न सभागृहात आमदार पोटतिडकीने विचारात असताना बालविकास मंत्री समाधानकारक उत्तर देत नसल्याने विरोधी आमदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

राज्यातील अंगणवाडी सेविकांना १५ हजार रुपये मानधन आणि मदतनीसांना १० हजार रुपये मानधन देणार का? असा सवालही अजित पवार यांनी मंत्र्यांना केला. दरम्यान अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या प्रश्नावर योग्य ते व समाधानकारक उत्तर बालविकास मंत्री लोढा यांनी न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दक्षिण मुंबई वीजपुरवठा खंडित प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करणार! – डॉ.नितीन राऊत

Aprna

भाजपची ऑफर न स्वीकारण्याइतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत – चंद्रकांत पाटील

News Desk

राहुल गांधींनी घेतली दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा यांची भेट

News Desk