HW Marathi
राजकारण

मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे शिवसेनेच्या वाटेवर

मुंबई | मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळली आहे. सोनावणे हे त्यांच्या समर्थकांसह मातोश्रीवर जाणार आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जुन्नर या मतदारसंघातून  सोनावणे एकमेव उमेदवार निवडून आले होते.

शरद हे त्यांच्या समर्थकांसह मातोश्रीवर दाखल झाले असून ते आज (५ मार्च) शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतु सोनावणे जर सनेत सामील होण्याची माहिती मिळताच जुन्नरमधील शिवसैनिकांनी त्यांना तीव्र विरोध केला आहे. बाहेरच्या  उमेदवार शिवसैनिक स्वीकारणार नसल्याची भूमिका जुन्नर तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. आमची भूमिका ऐकून न घेता शरद सोनावणे यांना उमेदवारी दिली तर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आपापल्या पदाचा सामूहिक राजीनामा देतील, असा इशाराही दिल्याची चर्चा आहे.

त्यामुळे मनसेच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. यापूर्वी महाआघाडीत  मनसेला सामावून घेण्यास काँग्रेस स्पष्ट नकार कळविला होता. काँग्रेस आणि मनसेसोबत वैचारिक मतभेत असल्यामुळे अशा पक्षांना महाआघाडीत सामील करून घेणे अवघड असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले होते. समविचार धारेच्या पक्षांनी एकत्र येवून भाजपचा लोकसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी महाआघाडीत मनसेचा समावेश करण्यात यासाठी अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या निवास्थानी जावून भेट घेतली होती.

Related posts

EXIT POLL : मिझोराममध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी तडजोड होणार का ?

News Desk

पंतप्रधान मोदी २ दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर

News Desk

भारत मोदी मुक्तीसाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे | राज ठाकरे

News Desk