HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार

मुंबई | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला आहे. चव्हाण यांनी नांदेडमधून सोमवारी (२५ मार्च) उमेवारी अर्ज दाखल केला होता. यानंतर चव्हाण यांच्या अर्जावर दोन अपक्ष उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे. जिल्हाधिकारी आणि मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे रात्री ९.३० वाजता निकाल देणार आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्जांच्या छाननीच्या दिवशी चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला.

भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर, अपक्ष उमेदवार रविंद्र थोरात आणि शेख अफजलोद्दीन अजिमोद्दीन उर्फ शेख सर (बहुजन महापार्टी) यांनी चव्हाण यांच्या उमेदवारीवर आक्षेपांवर आज प्रदीर्घ युक्तीवाद झाला. चव्हाण यांच्या प्रतिज्ञापत्रात २०१४ साली दाखल केलेल्या शपथपत्रात १ कोटी ५६ लाख ५७ हजार, आणि ८७ लाख रुपयांचे वेगवेगळे फंड दाखविले होता. परंतु यावेळी त्याचा कुठेही उल्लेख केला गेला नव्हता. याबद्दल उमेदवारांनी आक्षेप घेतले आहे.

तसेच भाजप उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी चव्हाण कुटुंबीयांच्या गॅस एजन्सीचे उत्पन्न आपल्या शपथपत्रात दाखविले नसल्याबद्दल आक्षेप घेतला. वेगवेगळ्या फंडांच्या माध्यमातून २०१४ साली दाखविलेली रक्कम या वर्षीच्या म्हणजे २०१९ च्या शपथपत्रात गायब करण्यात आली आहे. नेमके या फंडाचे काय झाले, त्याचे विवरण चव्हाण यांनी दिले नसल्याचा आक्षेपही नोंदविण्यात आला.

 

Related posts

आगामी निवडणुकांसाठी अखिलेश यादव-मायावती एकत्र येणार ?

News Desk

राज ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करणार, सूत्रांची माहिती

News Desk

ममता बॅनर्जी मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत

News Desk